आंबेगाव तालुक्यातील कन्येची महिला आयपीएल स्पर्धेसाठी निवड... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, May 20, 2022

आंबेगाव तालुक्यातील कन्येची महिला आयपीएल स्पर्धेसाठी निवड...

आंबेगाव तालुक्यातील कन्येची महिला आयपीएल स्पर्धेसाठी निवड...
------------------------=======
     
आंबेगाव (पुणे ) तालुका (प्रतिनिधी कैलास गायकवाड ):-  ता.२०/५/२०२२ थोरांदळे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील कन्येची महिला आयपीएल  स्पर्धेसाठी निवड.
 श्रद्धा भाऊसाहेब पोखरकर ही थोरांदळे गावातील शेतकरी कुटुंबातील कन्या हिची महिला  आयपीएल स्पर्धेसाठी  निवड झाली आहे.२३ मे पासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत संघातून खेळताना दिसणार आहे ट्रायब्लाझस्स या संघातून खेळताना दिसणार आहे. श्रद्धा चे प्राथमिक शिक्षण थोरांदळे गावात झाले. पुढील अभियांत्रिकी शिक्षणासाठी ती पुण्याला गेली. क्रिकेट खेळा ची आवड होती. दिलीप वेंगसरकरअकादमीत सरावाला सुरुवात केली.
 श्रद्धा ही महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
 यावर्षी महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाकडून खेळताना वृद्धाच्या अष्टपैलू कामगिरी सर्वांच्या नजरेत भरली. ती डावखऱ्या हाताने वेगाने गोलंदाजी करते. भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाच्या वतीने काही दिवसापूर्वी वरिष्ठ महिला टी -२०क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये चांगले कामगिरी करताना नऊ विकेट घेतल्या. त्यामुळे तिची आई पी एल स्पर्धेकरता निवड करण्यात आली. निवडीमुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
(पुण्यातील मोहन जाधव, डॉ. विजय पाटील, शादाब शेख, चंदन गंगावरणे, सूर्यवंशी यांचे मला मार्गदर्शन लाभले भारताचे क्रिकेट खेळाडू झुलन गोस्वामी व वेगवान गोलंदाज आशिष नेहरा हे माझे आवडते खेळाडू आहेत भविष्यात माझी भारताचे नेतृत्व करण्याची इच्छा आहे, माझ्या निवडीमुळे माझे नातेवाईक, मित्रपरिवार खूप आनंदी आहे.)

No comments:

Post a Comment