निरा सोमेश्वरनगर ; ( दि. 1.07.2022)
सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अधिपत्याखालील सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे हायस्कूल व ज्यु कॉलेजचे शिक्षकेतर कर्मचारी म्हणून गेली 35 वर्ष सातत्यपूर्ण सेवा कर्मी म्हणून कार्यरत असलेले
सुनिल (आण्णा) शिवाजी पाटोळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे माहिती दिल्ली येथील बाबू जनजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.नफेसिंह
खोबाजी दिल्ली यांनी पुरस्कार नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे कळविले आहे .येत्या 13जुलै 2022रोजी नवी दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे देशाचे माजी उपपंतप्रधान बाबू जनजीवन राम यांच्या 36व्या स्मृती दिनी राष्ट्रीय समर्पण दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून देश विदेशातील
30समाज सेवा कर्मींचा विशेष पुरस्कार देऊन लोकसभा माजी सभापती डॉ. मिराकुमार; केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व अन्य केंद्रीय मंत्री व मान्यवर व्यक्ती व संस्थांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य सचिव बाबू जनजीवन राम कला संस्कृती तथा
साहित्य अकादमी महाराष्ट्र राज्य यांनी वार्तालाप करताना कळविले आहे.सुनिल (आण्णा) शिवाजी पाटोळे यांची पुरंदर तालुका भारतीय कर्मचारी मजदूर युनियनचे पुरंदर तालुका अध्यक्ष
पदी नुकतीच निवड करण्यात आली असून पाटोळे यांनी निरा येथे आण्णा भाऊ साठे सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने अनेक मान्यवर व्यक्ती व संस्थांचे प्रतिनिधी यांना दरवर्षी पुरस्कार देऊन ते गौरव करतात.सामाजिक कार्याची बांधिलकी जपण्यासाठी सतत अग्रभागी असणारे कर्तृत्व दक्ष सुनिल (आण्णा ) शिवाजी पाटोळे
यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कारसाठी निवड झाल्यावर सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत
आहे.सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम दादा जगताप यांनी सुनिल आण्णा शिवाजी पाटोळे यांचे अभिनंदन केले आहे. तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन प्रा.दिगंबर दुर्गाडे सर; माजी आमदार अशोक टेकावडे;पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष युवा नेते व धर्मशील समाज सेवक भैय्यासाहेब तथा प्रविण अरूणराव खाटपे साहेब यांनी सुनिल आण्णा शिवाजी पाटोळे यांचे अभिनंदन केले आहे.
सुनिल आण्णा शिवाजी पाटोळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत व आदर्श समाज कार्य करीत आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या तत्वावर आधारित जीवन प्रवास फलदायी व
यशस्वी करण्यात सुनिल (आण्णा) पाटोळे हे यशस्वी झाले आहेत. मला दिल्ली येथे डॉ बी आर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाल्यावर जीवन सफल झाले आहे असे मत सुनिल पाटोळे यांनी व्यक करून समाधान झाले आहे
येथून पुढे आपण सामाजिक कार्य जोमाने सुरू करणार आहोत असे मत सुनिल (आण्णा) शिवाजी पाटोळे व्यकत केले आहे. सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे हायस्कूल व ज्यु कॉलेजचे सचिव; मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुनिल आण्णा शिवाजी पाटोळे यांचे अभिनंदन केले आहे. खास करुन महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर ह्यानी सुनिल आण्णा शिवाजी पाटोळे यांचे अभिनंदन केले असल्याचे सांगितले गेले.
No comments:
Post a Comment