पी एम किसान योजनेचे पैसे लाभार्त्यांना देण्यासाठी डाक विभागाची विशेष मोहीम. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, June 4, 2022

पी एम किसान योजनेचे पैसे लाभार्त्यांना देण्यासाठी डाक विभागाची विशेष मोहीम.

पी एम किसान योजनेचे पैसे लाभार्त्यांना देण्यासाठी डाक विभागाची विशेष मोहीम.
पुणे:- पी एम किसान योजनेचा ११ वा हप्ता बँकेत जमा झालेला आहे व त्याचे पैसे AEPS द्वारे घरपोच देण्यासाठी पुणे ग्रामीण विभागात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
पुणे ग्रामीण विभागात प्रत्येक पोस्टमनला इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा मोबाईल दिलेला आहे त्याद्वारे कुठल्याही बँकेमधील पैसे विनाशुल्क घरपोच काढून देता येतात.त्यासाठी फक्त आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक आवश्यक असतो. खेड्यामधील शेतकऱ्यांना लोकांना बँकेत जाऊन पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते तसेच त्यामध्ये त्यांचा दिवस जातो यासाठी पुणे ग्रामीण विभागामध्ये शेतकऱ्यांसाठी दि ३० मे ते १३ जून दरम्यान पंधरा दिवसांसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. तरी सर्वांनी या जवळच्या पोस्टमनला किंवा पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क करून AEPS द्वारे बँकेमधील पैसे काढावेत असे आवाहन पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक श्री बी पी एरंडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment