*श्री योगेश वाळुंजकर पी एस एस ग्रुप बी परीक्षेत उत्तीर्ण* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, June 4, 2022

*श्री योगेश वाळुंजकर पी एस एस ग्रुप बी परीक्षेत उत्तीर्ण*

*श्री योगेश वाळुंजकर पी एस एस ग्रुप बी परीक्षेत उत्तीर्ण*

पुणे:- श्री योगेश रामभाऊ वाळुंजकर , सहायक अधीक्षक भोर उपविभाग नुकत्याच झालेल्या डाक विभागाच्या पी एस एस ग्रुप बी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. श्री वाळुंजकर 422 गुण मिळवून ऑल इंडिया एक्झाम २०१९ च्या मेरिट  मध्ये 5 व्या नंबरने उत्तीर्ण झाले.श्री वाळुंजकर यांचे शिक्षण बी ए डी एड झाले असून 6.6.2006 रोजी पोस्ट विभागात पोस्टल असिस्टंट रुजू झाले आणि 9.5.2013 रोजी डाक निरीक्षक म्हणून परीक्षा पास झाले व बढतीद्वारे सहायक अधीक्षक पदावर 25.6.2019 पासून कार्यरत आहेत.

ए एस पी आणि आय पी असोसिएशन महाराष्ट्र सर्कल यांच्यामार्फत नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळेस श्री एस डी मोरे , अध्यक्ष महाराष्ट्र सर्कल, श्री बी पी एरंडे, अधिक्षक डाकघर पुणे ग्रामीण, श्री विलास घुले,असिस्टंट सेक्रेटरी, श्री चंद्रकांत भोर, एएसपी आरएमएस, श्री एस बी भंडारी, एएसपी जुन्नर उपविभाग, नेहा कुमारी एएसपी , पुणे शहर पश्चिम विभाग, श्री सी एम नदाफ, आयपी चिंचवड उपविभाग  व श्री नागेश डुकरे, आयपी आरएमएस उपस्थित होते

No comments:

Post a Comment