बापरे..कोतवाल 20 हजाराची लाच मागत असेल..तर तलाठी, सर्कल किती लाच घेत असतील? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, July 18, 2022

बापरे..कोतवाल 20 हजाराची लाच मागत असेल..तर तलाठी, सर्कल किती लाच घेत असतील?

बापरे..कोतवाल 20 हजाराची लाच मागत असेल..तर तलाठी, सर्कल किती लाच घेत असतील?

 पुणे : - लाच घेणाऱ्याचे प्रमाणात वाढ होतच चालली असून नुकताच जागेची 7/12 उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी 20 हजार रुपये लाच मागणाऱ्या हवेली तालुक्यातील वकडी तलाठी कार्यालयातील कोतवाल नामदेव बाबुराव शिंदे(वय 48) याच्याविरुद्ध पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. नामदेव शिंदे याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात  भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि. 18) गुन्हा दाखल करुन अटक  केली आहे. याप्रकरणी 46 वर्षाच्या तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.पुणे एसीबीने 27 आणि 28 जून रोजी पडताळणी केली असता आरोपी नामदेव शिंदे याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सोमवारी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. तक्रारदार यांच्या मित्राची हवेली तालुक्यातील वडकी येथे चार गुंठे जागा आहे.या जागेची 7/12 उताऱ्यावर नोंद करण्यासाठी व पुढील कार्यवाहीसाठी सर्कल कार्यालयात पाठवण्यासाठी वडकी तलाठी कार्यालयातील कोतवाल नामदेव शिंदे याने स्वत:साठी व तलाठी यांच्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपये लाच मागितली.
तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.
पडताळणीमध्ये लाच मागितल्याचे निष्पन्न
झाल्याने कोतवाल शिंदे याच्यावर गुन्हा दाखल
करुन अटक करण्यात आली आहे.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे
परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.
पुढील तपास पोलीस उप अधीक्षक सीमा
आडनाईक करीत आहेत.

No comments:

Post a Comment