मुलांचा संपत्तीवरील अधिकार कायम असेल जरी आई वडिलांनी घटस्फोट घेतला असला तरी; - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, July 17, 2022

मुलांचा संपत्तीवरील अधिकार कायम असेल जरी आई वडिलांनी घटस्फोट घेतला असला तरी;

मुलांचा संपत्तीवरील अधिकार कायम असेल जरी आई वडिलांनी घटस्फोट घेतला असला तरी;                                                                   गुजरात:-गुजरात उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल दिला, एखाद्या अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांनी जरी घटस्फोट घेतला असला तरी त्याचा वडिलांच्या संपतीवर अधिकार कायम असल्याचं गुजरात उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.त्या मुलाच्या वडिलांनी जरी दुसऱ्या स्त्रीसोबत लग्न केलं असलं तरी त्या मुलाला संपत्तीवरचा अधिकार नाकारता येत नाही असं महत्वपूर्ण निरीक्षण गुजरात उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. गुजरात उच्च न्यायालयाने दोन वेगवेगळ्या प्रकरणांवर सुनावणी करताना अशा आशयाचा निकाल दिला आहे.घटस्फोटाचे दोन वेगवेगळी प्रकरणं न्यायालयासमोर होती.त्यामध्ये घटस्फोट घेताना वडिलांनी भविष्यात मुलांना त्यांच्या संपत्तीवर अधिकार नसल्याची अट ठेवली होती. त्यावर वडिलांच्या संपतीवर मुलाचा अधिकार नसेल या अटीवर जोडप्याला घटस्फोट घेता येणार नाही असंही न्यायालयाने म्हटलं आहे.
न्यायालयाने त्यांच्या आदेशात सांगितलं आहे की,
वडिलोपार्जित संपत्तीवर त्या मुलांचा अधिकार असेल. जरी एखाद्या व्यक्तीने दुसरा विवाह केला असला तरी पहिल्या पत्नीच्या मुलांचा त्याच्या संपत्तीवर अधिकारकायम राहिल. वडिलोपार्जित संपत्तीवर त्या मुलांचा अधिकार असेल जरी एखाद्या व्यक्तीने दुसरा विवाह केला असला तरी
पहिल्या पत्नीच्या मुलांचा त्याच्या संपत्तीवर अधिकार कायम राहिल.या प्रकरणात न्यायालयाने दोन्ही जोडप्यांना घटस्फोट
दिला आहे. पण वडिलांनी त्यांच्या मुलांना संपत्तीवरचा नाकारलेला अधिकार मात्र मान्य केला नाही. त्या मुलांचा संपत्तीवरील अधिकार कायम असेल असा निकाल न्यायालयाने दिला आहे.एखाद्या जोडप्याचा घटस्फोट झाल्यानंतर आणि संबंधित व्यक्तीने दुसऱ्या स्त्रीसोबत लग्न केल्यानंतर,पहिल्या स्त्रीपासून झालेल्या अपत्यांना संपत्तीमध्ये अधिकार नाकारला जातो. देशात अनेक ठिकाणी या अशा गोष्टी सर्रास होतात. गुजरात न्यायालयाने आज
दिलेला निकाल हा या अशा प्रकरणामध्ये दिशादर्शक ठरणारा आहे.

No comments:

Post a Comment