वडिलांच्या परिस्थितीची जाणीव ठेवत सीए परीक्षात वैष्णवीने मारली बाजी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 19, 2022

वडिलांच्या परिस्थितीची जाणीव ठेवत सीए परीक्षात वैष्णवीने मारली बाजी..

वडिलांच्या परिस्थितीची जाणीव ठेवत सीए परीक्षात वैष्णवीने मारली बाजी.. 
बारामती:- शहरातील खंडोबानगर येथील वैष्णवी रमेश राजपुरे -चांदगुडे  हिने वडिलांच्या गरिबीच्या परिस्थितीची जाणीव ठेवून सीए (चार्टड अकाउंट) परीक्षेत यश मिळवले आहे. वैष्णवी चा सीए परीक्षेचा निकाल जाहीर होताच पोरीने शिक्षणाचे चीज केले म्हणून आई-वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. पहिल्याच प्रयत्नात सीए परीक्षा उत्तीर्ण केल्याने सर्व स्तरातून वैष्णवी चे कौतुक केले जात आहे.
         खरंतर दहावी परीक्षा पास झाल्यानंतरच वैष्णवी ने सीए होण्याचे स्वप्न उराशी बाळगलं होत. पण घरची परिस्थिती बेताची असल्याने महागडे क्लास लावणे परवडणारे नव्हते. शिवाय मार्गदर्शन करायला कोणीही नव्हते. सोबतीला होती ती फक्त जिद्द आणि चिकाटी वैष्णवीच्या जिद्दीपुढे तिच्या परिस्थितीने देखील हात टेकले आहेत. तिने केवळ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नाच्या जोरावर सीए परीक्षेच्या सर्व पातळ्या उत्तीर्ण केल्या आहेत.
    वैष्णवी चे वडील रमेश निवृत्ती राजपुरे हे ड्रायव्हर आहेत. तर आई छोट्या कंपनीमध्ये काम करीत आहे. त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. आर्थिक परिस्थिती गरिबीचे असतानाही त्यांनी मुलगी वैष्णवी हिला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. अनेकांनी मुलीला एवढे शिकवून काय करणार असा फुकटचा सल्लाही दिला परंतु मुलगी अभ्यासात हुशार असल्याने तिने निवडलेल्या सीएच्या करिअरसाठी ते तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. वैष्णवीला आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची व परिस्थितीची जाणीव होते म्हणूनच तिने जिद्द चिकाटे आणि मेहनतीच्या जोरावर रात्र दिवस अभ्यास करून सीए ची परीक्षा देऊन पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. मुलगी सीए झाल्याने रमेश राजपुरे यांच्या कुटुंबाचे नाव उंचवले आहे. 
       यावेळी आपल्या यशाबद्दल बोलताना वैष्णवीने सांगितले की, सीए परीक्षा उत्तीर्ण होण्याचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. महागडे क्लास लावणे आणि तिथे जाऊन अभ्यास करणे परवडणारे नव्हते. शिवाय सीए होणे सोपे नसतं ते मला झेपणार नाही असे सल्ले देऊन मनाचे खच्चीकरण करणारे देखील भरपूर होते पण कॉमर्स शाखेत प्रवेश घेतलाय म्हटल्यावर सीए व्हायचं हा निश्चय मनाशी पक्का केला होता.

No comments:

Post a Comment