दुर्दैवी घटना,पोलीस कर्मचाऱ्याची
आत्महत्या..! पुणे :- पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या पुणे शहर पोलीस कर्मचाऱ्याने लोणी काळभोर येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. सुनील नारायण शिंदे (वय 48 रा. कवडी माळवाडी ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाहीत. सुनील शिंदे हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांनी बुधवारी (दि.27) मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शिंदे हे हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कवडीमाळवाडी परिसरात मागील अनेक वर्षांपासून वास्तव्यास होते. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे ते आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. आज सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी पंख्याला खिडकीच्या पडद्याने आत्महत्या केल्याचे आढळून आले. सकाळी अकराच्या सुमारास शिंदे यांचा मुलगा वडिल उठले का नाहीत हे पाहण्यासाठी गेला.त्याने खोलीचा दरवाजा ठोठावला, वडिलांना आवाज दिला. मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
त्यामुळे त्याने खिडकीतून पाहिले असता
सुनील शिंदे यांनी पंख्याला गळफास
घेतल्याचे आढळून आले.घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अमोल घोडके व पोलीस हवालदार भोसले यांनी घटनास्थळी धाव
घेतली.
No comments:
Post a Comment