नराधमांची मजल.. 300 रुपयात 11 वर्षाच्या मुलीवर 9 जणांनी महिनाभर आळीपाळीने केला बलात्कार..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, July 28, 2022

नराधमांची मजल.. 300 रुपयात 11 वर्षाच्या मुलीवर 9 जणांनी महिनाभर आळीपाळीने केला बलात्कार..!

नराधमांची मजल.. 300 रुपयात 11 वर्षाच्या मुलीवर 9 जणांनी महिनाभर आळीपाळीने केला बलात्कार..!
नागपूर :महाराष्ट्रात कितीतरी ठिकाणी मुलींवर व महिलांवर असे अत्याचार होत आहे, मात्र याबाबत ठोस पाऊलं उचलली जात नाही, की काय, की कायदा कडक नाही ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे अशीच एका घटनेने महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. 11 वर्षाच्या मुलीवर 9 नराधमांनी तब्बल महिनाभर आळीपाळीने  बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये  घडली आहे.
आरोपींनी बलात्कार करण्यासाठी पीडित मुलीला
मोबदला म्हणून 300 रुपये दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. जिथे ही घटना घडली ते एक खेडेगाव असून नागपूर शहरापासून 60 किमी अंतरावर आहे. घटना उघडकीस येताच ग्रामस्थ आक्रमक झाले.यांनतर पोलिसांनी तात्काळ याची गंभीर दखल घेत आरोपींचा शोध सुरु केला. सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.परिचयाच्या व्यक्तीनेच बलात्कार केल्याचे कळतंय,नागपूर जिल्ह्यातील उमरेडजवळील एका गावात बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे.या 11 वर्षीय शाळकरी मुलीवर गावातच राहणाऱ्या एका व्यक्तीने बलात्कार केला. या व्यक्तीने खोटे बोलून
या मुलीला त्याच्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच याविषयी कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. त्याच्यासोबत त्याच्या इतर साथीदारांनी देखील या मुलीवर अत्याचार केला.त्यानंतर 300 रुपये दिले ओळखीच्या व्यक्तीने या मुलीवर बलात्कार केल्यानंतर या मुलीला धमकावले. याविषयी कोणाला सांगितले तर जीवे मारु अशी धमकी देखील आरोपीने दिली.अत्याचार केल्यानंतर आरोपीने पीडित मुलीला 300
रुपये देखील दिले. हे पैसे मी दिलेत असे तुझ्या
घरच्यांना सांगू नकोस. हे पैसे मला सापडले आहेत असे सांग. अजून काही लोक येणार आहेत. त्यांनाही असेच करु दे ते देखील तुला पैसे देतील असे आरोपीने सांगीतले. यानंतर नऊ नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला. पीडितेचे आई-वडील मजूर कामगार आहेत.घटना उघडकीस येताच गावात ही घटना कळल्याने हादरले या घटनेमुळे गावातील मुली आणि महिलांमध्ये दहशत पसरली आहे. ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल
घेत आरोपींना अटक केली. या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध घेऊन
 रोशन करगावकर (29) आणि त्याचे मित्र/परिचित गजानन मुरस्कर (40), प्रेमदास गाठबांधे (38), राकेश महाकाळकर (24), गोविंदा नाटे (22), सौरभ उर्फ करण रिठे (22) नितेश फुकट (30), प्रद्युम्न करूटकर
(22) आणि निखिल उर्फ पिंकू नरुळे (24) अशी
आरोपींची नावे आहेत. या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी रोशन करगावकर हा अल्पवयीन मुलीच्या शेजारी राहतो. रोशन करगावकर हा एका हत्या प्रकरणातील आरोपी असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने या अत्याचाराची कबुली दिली आहे.दरम्यान या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश होता याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment