बारामतीतील प्रा. गोरख साठे सर यांना भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, July 28, 2022

बारामतीतील प्रा. गोरख साठे सर यांना भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान..

बारामतीतील प्रा. गोरख साठे सर  यांना भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान..
नेपाळ( काठमांडू)(विशेष प्रतिनिधी दि.27.08.2022):- भारतीय दलित साहित्य अकादमी व नेपाळ दलित साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने 28 जुलै 2022 रोजी दुपारी 2 वा.नेपाल प्रज्ञा प्रतिष्ठान कामलाडी काrठमांडू नेपाळ येथे बाराव्या अशियन कॉन्फरन्स ऑफ दलित साहित्य अकादमीचे आयोजन करण्यात आले होते नेपाळच्या नॅशनल असेंबलीचे फॉर्मल मेंबर ऑफ द पार्लमेंट ॠषी बाबू परियार; नेपाळचे फार्मर प्रेसिडेंट युनिफाईड दलित राईट फोरमचे अध्यक्ष लक्ष्मण बारदेवा ;दलित साहित्य अकादमी थायलंडचे समन्वयक फिशगाभुयान गोनमी;   नॅशनल सेक्रेटरी दलित साहित्य अकादमी अँड ग्लोबल कोरोना वॅरियर अवॉर्ड कमिटी इंडियाचे कन्विनिअर महेंद्र कुमार सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामती येथील  प्रा. गोरख साठे यांना या बाराव्या अशियन कॉन्फरन्स ऑफ दलित साहित्य अकादमीच्या वतीने" भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार  प्रदान करण्यात आला.प्रा. गोरख साठे यांच्या अनुपस्थितीमुळे "भारत रत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस  व युवा नेते राजकुमार दिलीपराव पाटील यांनी तो पुरस्कार काठमांडू नेपाळ येथे स्विकारला. यावेळी राजकुमार दिलीपराव पाटील माढा यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेवून नेपाळ दलित साहित्य अकादमी व भारतीय दलित साहित्य अकादमीचे वतीने राष्ट्रीय सरचिटणीस युमनाम महेंद्रसिंग मनीपुर इंफाळ यांच्या हस्ते सामाजिक कार्याबद्दल इंडो नेपाळ फ्रेन्डशिप आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी पुणे येथील समाज सेवक विकास  कुमार रास्तोगी यांना डाॅ बी आर आंबेडकर आंतरराष्ट्रीय   पुरस्कार  प्रदान करण्यात आला. सर्व स्तरातून प्रा गोरख साठे सर बारामती; राजकुमार दिलीपराव पाटील,माढा;सोलापूर;विकास कुमार रास्तोगी पुणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हितचिंतकाच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment