*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता पदी पँथर अविश राऊत यांची नियुक्ती* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 5, 2022

*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता पदी पँथर अविश राऊत यांची नियुक्ती*

*महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता पदी पँथर अविश राऊत यांची नियुक्ती*

मुंबई :- दिनांक 5 जुलै 2022 रोजी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष लोकनेते नामदार आदरणीय नानाभाऊ पटोळे साहेब यांच्या हस्ते आपल्या मुंबई येथील शासकीय निवास्थानी पँथर अविश राऊत यांची महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली.           
          दिनांक 27 मे 2022 रोजी पालघर जिल्हातील लायन्स क्लब पालघर येथे पँथर अविश राऊत यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह प्रांताध्यक्ष नामदार आदरणीय नानाभाऊ पटोळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला होता. सदर कार्यक्रमात पँथर अविश राऊत यांना मानणारे तसेच त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आणि प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते , समर्थक व त्यांचे सहकारी यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला होता.      
             यावेळी सदर कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना नामदार आदरणीय नानाभाऊ पटोळे साहेब यांनी पँथर अविश राऊत यांच्यावर विश्वास ठेवून त्यांची नियुक्ती लवकरच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या जबाबदार पदी करण्याचे वचन उपस्थित कार्यकर्त्यां समक्ष दिले होते. आणि आज वचन पूर्तता करत मुबई निवस्थानी पँथर अविश राऊत यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता काँग्रेस कमिटी वर करण्यात आली. राज्यात काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी तसेच काँग्रेस पक्षाची विचारधारा बहुजन समाजात अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे असे आदेश प्रांताध्यक्ष नामदार नानाभाऊ पटोळे साहेब यांनी राऊत यांना दिले. त्याच प्रमाणे अविश राऊत यांचे जवळचे विश्वासू सहकारी यांचाही जिह्यातील महत्वाच्या पदांवर  नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ता अरुण सावंत , महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा पालघर जिल्हा प्रभारी यशवंत सिंह ठाकूर व अनेक मान्यवर तसेच पालघर जिल्हा मुख्य उपाध्यक्ष जगदीश राऊत , जिल्हा सरचिटणीस भरत महाले ,भावेश दिवेकर , अजिंक्य म्हस्के , पालघर जिल्हा चिटणीस चंद्रसेन ठाकूर व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment