डॉ. आरती ( विजयकुमार भोसले) निलेश आढाव यांना दिल्ली नॅशनल वेमेन्स एक्सलन्स अवार्ड... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, July 29, 2022

डॉ. आरती ( विजयकुमार भोसले) निलेश आढाव यांना दिल्ली नॅशनल वेमेन्स एक्सलन्स अवार्ड...

डॉ. आरती ( विजयकुमार भोसले) निलेश आढाव यांना  दिल्ली नॅशनल वेमेन्स एक्सलन्स अवार्ड...
नवी दिल्ली ( दि. 30.07.2022):- सातत्यपूर्ण सेवा कर्मी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. आरती विजयकुमार भोसले यांच्या सामाजिक ;शैक्षणिक
कार्याची दखल दिल्ली येथील नॅशनल युथ अवारडीज फेडरेशन ऑफ इंडिया या केंद्रीय स्तरावरच्या मान्यता प्राप्त संस्थेच्या संयुक्त विद्यमाने व डॉ. विशाखा सोशिल फाऊंडेशन नवी दिल्ली; यांच्या वतीने जाहीर झाला असून येत्या 12ऑगस्ट 2022 रोजी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथील बॅक्वेट सभागृह येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याचे नॅशनल युथ अवारडीज फेडरेशन ऑफ इंडियाचे नॅशनल सेक्रेटरी डॉ.मनिष गवई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. डॉ. आरती विजय कुमार भोसले यांनी सुप्रसिद्ध साहित्यिक राजन
गवस यांच्या साहित्यातील समग्र व्यक्ती रेखा: स्त्रीवादी आकलन या विषयावर पुणे विद्यापीठात पी.एच.डी प्रबंध सादर केला असून डॉ.प्रभाकर देसाई हे मार्गदर्शक होते. डॉ आरती विजय कुमार भोसले ह्या गेल्या 20 वर्षापासून फर्ग्युसन महाविद्यालात कार्यरत आहेत. डॉ. आरती आढाव या सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाचे माजी उपकुलसचिव चंद्रकांत तात्या आढाव यांच्या स्नूषा होत. नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे 12आगस्ट रोजी रामदास आठवले व केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ भागवत कराड, मिझोरामचे माजी राज्यपाल
अमोलक रत्न कोहली; अनुराग ठाकुर मंत्री यांच्या हस्ते व मान्यवर व्यक्ती व संस्थांचे प्रतिनिधीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. डॉक्टर आरती निलेश आढाव यांनी आतापर्यंत विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळा व नियतकालिकांमध्ये स्त्रीवाद तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावरती
एकूण पंधरा शोध निबंध सादर केल्या असून 2015 2016 या कालावधीमध्ये यशवंत नारायण पाटणकर पुरस्कार त्यांना मिळाला आहे हिमाक्षरा राष्ट्रीय साहित्य परिषद वर्धा यांच्याकडून जानेवारी 2017 मध्ये डॉक्टर एपीजे
अब्दुल कलाम एज्युकेशनल एक्सप्रेस पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे डॉ. आरती विजयकुमार भोसले यांचे शिक्षण बीएससी वनस्पती शास्त्र असून बीए ( मराठी ) एम ए (मराठी ) युजीसी नेट (पास) मराठी पी.एच.डी .(मराठी) आणि सध्या आरती विजयकुमार भोसले या एमबीएच्या द्वितीय वर्षामध्ये आपले शिक्षण पूर्ण करत आहे.
मुकुटराव साहेबराव काकडे कॉलेजचे राज्य शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ निलेश आढाव यांच्या त्याच्या धर्मपत्नी होत .12 ऑगस्ट 2022 रोजी नवी दिल्ली येथील न्यू महाराष्ट्र सदनाच्या सभागृह डॉ आरती निलेश आढाव यांच्या सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याबद्दल त्यांना नॅशनल वेमेन्स एक्सलन्स अवार्ड प्रदान करण्यात येणार असल्याचे मत प्रा. साठे यांनी वार्तालाप अवार्ड केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले डॉ.भागवत कराड, वित्त राज्यमंत्री भारत सरकार मिझोरामचे मा. गव्हर्नर अमोलीक रतन कोहली आणि केंद्रीय युवा आणि क्रीडा राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये डॉ. आरती निलेश आढाव यांना फेडरेशन ऑफ इंडिया चा नॅशनल वेमेन्स एक्सलन्स अवार्ड जाहीर झाल्याने परिसरातील विविध संस्थांचे शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग एम एस काकडे कॉलेजचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग पुणे विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागाच्या वतीने डॉ आरती निलेश आढाव यांना नॅशनल वेमेन्स एक्सलन्स अवार्ड 2022 जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment