महिला डॉक्टर ची सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, July 25, 2022

महिला डॉक्टर ची सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता..

महिला डॉक्टर ची  सरकारी कामात अडथळा
आणल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता..               बारामती:-बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण व गंभीर दुखापत करून सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपातून महिला डॉक्टर
आशा अविनाश कदम यांची बारामती
येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश
एस. बी. राठोड यांनी सबळ पुराव्याअभावी
निर्दोष मुक्तता केली. पोलीस ठाण्याच्या आवारात सरकारी कर्तव्य बजावत असताना शिवीगाळ दमदाटी करून व त्याचा उजवा हात धरून कानशीलात लगावली. असे कृत्य करून सरकारी कामात अडथळा आणण्याबाबत व गंभीर दुखापत केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास होऊन दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारी पक्षाच्या वतीने
सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये
चार पोलीस कर्मचारी, एक वैद्यकीय
अधिकारी व दोन खासगी साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीच्या वतीने ऍड.विनोद जावळे यांनी कामकाज पाहिले.युक्तिवादमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची साक्ष विश्वसनीय नाही. जखमी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपीकडून गंभीर दुखापत झाल्याचे वैद्यकीयदृष्टीने निष्पन्न होत नाही.घटनेच्यावेळी महिला पोलीस कर्मचारी
कर्तव्य बजावत असल्याचे निष्पन्न होत
नाही,साक्षीदारांच्या साक्षीमध्ये तफावत
आढळून येत आहे. पोलीस तपास
व्यवस्थित झालेला नाही, गुन्ह्यात वापरलेला
मुद्देमाल सिद्ध होत नाही. तसेच मुंबई उच्च
न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे विविध
दाखले ऍड. विनोद जावळे यांनी सादर केले.
हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने ऍड.जावळे, ऍड प्रणिता जावळे, ऍड. राहुल शिंदे यांनी कामकाज पाहिले.

No comments:

Post a Comment