आत्ता सावकारी करणाऱ्यांचे खरं नाय..सावकारीतून केलेली खरेदीखते रद्द करण्याचे सहकार विभागाला अधिकार, पोलिसांकडे गुन्हे नोंदवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, July 25, 2022

आत्ता सावकारी करणाऱ्यांचे खरं नाय..सावकारीतून केलेली खरेदीखते रद्द करण्याचे सहकार विभागाला अधिकार, पोलिसांकडे गुन्हे नोंदवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

आत्ता सावकारी करणाऱ्यांचे खरं नाय..सावकारीतून केलेली खरेदीखते रद्द करण्याचे सहकार विभागाला अधिकार, पोलिसांकडे गुन्हे नोंदवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे :- 'देर आये दुरुस्त आये',अशी म्हणण्याची वेळ आली,गेली अनेक वर्षांपासून सावकारीच्या कचाट्यात सापडलेले पीडित,कर्जबाजारी शेतकरी यांच्या सावकारी च्या पायात जमिनी गेल्या तर अनेकांनी आत्महत्या केल्या अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या परंतु कारवाई केली नसल्याचे अनेक पीडितांनी सांगितले, नुकताच असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले की,सावकारी रोखण्यासाठी सहकार विभागाने पोलीसांची मदत घेऊन स्वयंप्रेरणेने गुन्हे दाखल केले पाहिजेत. सहकार विभागाच्या प्रत्येक सहायक निबंधकांनी जास्तीत जास्त तपासणी करावी आणि योग्य पद्धतीने गुन्हे दाखल होतील याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमाबाबत जिल्हाधिकारी समितीची बैठक डॉ. देशमुख 
यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पुणे शहराचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी
संस्था नारायण आघाव, पुणे शहर पोलीस
आयुक्तालयाचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त
श्रीनिवास घाडगे पिंपरी चिंचवड पोलीस,
आयुक्तालयाचे गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त पद्माकर घनवट, पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक बाळासाहेब तावरे,यांच्यासह पुणे शहरातील सहकारी संस्थांचे उपनिबंधक आदी उपस्थित होते.सावकारीतून केलेली खरेदीखते रद्द करण्याचे सहकार विभागाला अधिकार जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, अवैध सावकारीविरोधात तक्रारी करण्याच्या
नागरिकांनी अनुषंगाने पिडीत पुढे येण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. तक्रारदारांमध्ये आपली दखल घेतली जाईल असा विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. सहकार विभागाला या कायद्याच्या अनुषंगाने व्यापक अधिकार असून व्याजाच्या पैशाच्या बदल्यात केलेली खरेदी खते रद्द करण्याचेही महत्वाचे अधिकार या विभागाला आहेत. या अधिकारांचा उपयोग सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी करावा. यावेळी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे म्हणाले, अवैध सावकारी विरोधात कारवाई करण्यासाठी
सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीसांना माहिती द्यावी.संबंधितांवर गतीने संयुक्तपणे कारवाई केल्यास अशा गैरप्रकारांना निश्चितच आळा बसेल.पोलीस विभागाकडून यामध्ये पूर्ण सहकार्य देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
जिल्ह्यात परवाने असलेले 1 हजार 456
खासगी सावकार यावेळी नारायण आघाव यांनी माहिती दिली,अवैध सावकारी रोखण्यासाठी सर्व तालुक्यात स्थायी भरारी पथके नेमण्यात आले आहेत.पोलीस, सहकार विभाग आणि महसूल
विभागाच्या समन्वयाने यामध्ये काम सुरू आहे.
हा गुन्हा यापूर्वी अदखलपात्र होता. मात्र आता
कायद्यात दुरूस्ती करुन आता दखलपात्र
करण्यात आल्यामुळे या गुन्यांना आळा
बसला आहे.जिल्ह्यात परवाने असलेले 1 हजार 456 खासगी सावकार असून त्यापैकी 404
परवान्यांचे नूतनीकरण झाले असून 982 प्रलंबित आहेत. त्याबाबत गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश सहायक निबंधकांना दिले आहेत.

No comments:

Post a Comment