बारामतीतला राऊत कधी जाणार?पक्ष कार्यकर्त्यांच्यात नाराजीचा सूर.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, July 22, 2022

बारामतीतला राऊत कधी जाणार?पक्ष कार्यकर्त्यांच्यात नाराजीचा सूर..

बारामतीतला राऊत कधी जाणार?पक्ष कार्यकर्त्यांच्यात नाराजीचा सूर..                 बारामती:- सध्या च्या परिस्थितीत राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्तेची उलथापालथ झाली शिवसेनेचे बहुसंख्य आमदार, खासदार, पदाधिकारी व शिवसैनिक ठाकरे सरकार मधून व पक्षातून बाहेर पडून शिंदे गटात गेले याला कारण दिले पक्षात असलेल्या नाराजीचे पण ही कुणामुळे झाली व नाराजीचा सूर कोणावर होता हे आपण टीव्ही वर व वृत्तपत्रात वाचले बहुतांशी नाराजी ही संजय राऊत यांच्यामुळे झाली असल्याचे पाहिले व वाचले,अशीच नाराजी काही अंशी बारामतीत देखील असल्याची खंत एका राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांनी व माजी नगरसेवकांनी खाजगीत बोलताना व्यक्त केली, नेत्यांपुढे पुढे करून आम्हा कार्यकर्त्यांना पोहचू दिले जात नाही, काही सांगावे बोलावे तर हे जे तथाकथित राऊत आहे( कार्यकर्त्यांनी दिलेली उपमा कार्यकत्यांच्या तोंडून ऐकावयास येत असल्याचे कळतंय) ते स्वतःच सर्व काही करीत असल्याचे भासवीत आहे यामुळे आम्ही काही कामे करतो की नाही, आमच्या काही समस्या आहे की नाही हा प्रश्न सद्या कार्यकत्यांच्या संतप्त भावनेतून चौकाचौकात ऐकावयास मिळत आहे,यामुळे येणाऱ्या बारामती नगर परिषदे सह इतर निवडणूकित याचा फार मोठा दणका पक्षाला बसल्याशिवाय राहणार असेही बोललं जात आहे, यावरून तरी वेळीच नेत्यांनी याकडे लक्ष देऊन कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घ्यावीत असे राऊत बाजूला सारून वेळीच पक्षातील नाराजी दूर करावी कारण येथे स्पष्ट बोललं तर त्याचे काही खरं नाही अशी भावना तयार झाली आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment