उद्या होणार शपथविधी,शिंदे-फडणवीस सरकारचे 18 मंत्र्यांचा समावेश.? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, August 8, 2022

उद्या होणार शपथविधी,शिंदे-फडणवीस सरकारचे 18 मंत्र्यांचा समावेश.?

उद्या होणार शपथविधी,शिंदे-फडणवीस सरकारचे 18 मंत्र्यांचा समावेश.?
मुंबई : विरोधकांच्या टीकेला लवकरच उत्तर मिळणार,राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर उद्या सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती समोर आली आहे. १७ ते १८ मंत्र्यांचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता आहे.दरम्यान हा शपथविधी राजभवनातील दरबार हॉल मध्ये होण्याची शक्यता असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल 38 दिवस झाले तरी राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. दरम्यान मंत्रीमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. या विस्तारात गृहमंत्रीपद हे
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहण्याची शक्यता असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही मंत्रिमंडळात असतील.लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे.मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यास कोणत्याही प्रकारची अडचण किंवा अडथळा नाही. खात्यांची जबाबदारी
सचिवांकडे दिली आहे. कोणत्याही खात्याचे काम
थांबवले नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते घेत आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी  माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

No comments:

Post a Comment