बापरे..बारामती तालुक्यातील ५९ मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई..!
बारामती : खळबळजनक माहिती समोर आली,बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद
प्राथमिक शाळांतील १४१५ विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्त्यापासून वंचित ठेवल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तीन शिक्षण विस्तार अधिकारी, चार केंद्रप्रमुखांसह ५९
मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.बारामती तालुक्यात शिक्षण विभागातील ६६ जणांवर
एकाचवेळी शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याने खळबळ उडाली आहे.या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते पोपट धवडे
यांनी तक्रार केली होती. जिल्हा परिषद शाळांमध्ये अनुसूचित जाती-जमातीच्या मुली आणि भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांना प्रतिदिन एक रुपया उपस्थिती भत्ता दिला जातो. तो दिला गेला नसल्याची धवडे यांची तक्रार होती. यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. याप्रकरणी जिल्हा परिषदेकडून तपासणी करण्यात आल्यानंतर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील ८०० व भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या ६१५ अशा १४१५ विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता दिला नसल्याचे चौकशीत समोर आले होते.
No comments:
Post a Comment