माळेगाव खुर्द येथील गव्हाणे कुटुंबातील व्यक्तींना २ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 30, 2022

माळेगाव खुर्द येथील गव्हाणे कुटुंबातील व्यक्तींना २ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा..

माळेगाव खुर्द येथील गव्हाणे कुटुंबातील व्यक्तींना २ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा..                      माळेगाव:- बापू यादवराव गव्हाणे वय 33 वर्षे व्यवसाय शेती माळेगांव खुर्द ता. बारामती जि. पुणे मध्ये अॅडमिट असताना व पूर्ण शुद्धीवर असताना जबाब लिहून देतो की,मी आटोळे हॉस्पीटल बारामती येथे जनरल वार्ड मध्ये उपचार घेत आहे, मी वरील ठिकाणी पत्नी सौ मोहिनी, आई मंगल, दोन मुले असे एकत्रित रहाणेस आहे व आंम्ही शेती व्यवसाय करतो.
मी आमचे मौजे माळेगाव खुर्द येथे मी शेतात उसाचे पिकास पाणी देण्यास जाताना दि. ०७/०९/२०१७ रोजी सकाळी ११:३० वा.चे सुमारास पाणी देण्यासाठी जात असताना माझे चुलते भिमदेव रामा गव्हाने हे त्यांचे ट्रैक्टरने त्यांचे शेत नांगरत होते. त्यावेळी मी माझी मो. सा.न. MH-14 C.OR. 65 ही वरुन शेडने जात असताना भिमदेव शिविगाळी करून या रस्त्याने जायचे यायचे नाही व शेतात पाय ठेवायचा नाही व आपले भावकीपण राहिले नाही असे म्हणून तुझ्याकडे बघायचे आहे काय असे म्हणून माझे अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी घाबरून माझी मो.सा. घेऊन परत शेतातून घरी जात असताना भिमदेव गव्हाणे यांनी त्यांची मुले राहुल भिमदेव गव्हाणे, दमा भिमदेव गव्हाणे यांना फोन करून सांगितले की बाप्याला संपवयाचा आहे लवकर शेताकडे या असे सांगितले. त्यावेळी मी माझे मोटार सायकल वरून कऱ्हा वागज रोड,माळेगाव खुर्द रोडने राहते घरी जात असताना अनिल जगताप ऊसाचे मानवळ आलो असताना माळेगाव खुद्राकडून पिकअप चारचाकी गाडी न MH-11 T-3363 ही वेगात आली व रॉग साईटला येऊन माझे अंगावर गाडी घातली. त्यावेळी मी माझे मोटार सायकल वरून वरून खाली पडलो. त्यावेळी पिकअप चालक दला हवे हो दरवाजा उघडुन खाली
उतरला व मला शिव्या दिल्या. त्यावेळी पिकअप गाडीतून खाली उतरून राहुल गव्हाणे हा हातात लोखंडी टामी घेऊन खाली उतरून शिव्या देत माझे जवळ आला व माझे डोक्यात जोरात टामी मारली तुला आता खल्लास करतो असे म्हणून ते तेथून पळून गेले. त्यावेळी तेथे अंकुश यादवराव गव्हाणे नवनाथ सदाशिव गव्हाणे,अशोक पिराजी
जगताप, बापू लालासो माकर, सुरेश साधु खोमणे हे तेथे आले त्यांनी मला बारामती येथील डॉ. आटोळे यांच्या दवाखान्यात ऍडमिट केले आहे. दत्ता गव्हाणे याने त्याची  गाडी माझे अंगावर घातल्याने माझा उजवे हाताचा पंजा, उजवे पायाचे गुडगा व उजवी कोपरी असे फॅक्चर झालेले आहे म्हणून माझी 10 भिमदेव रामा गव्हाणे, राहुल भिमदेव गव्हाणे, दत्ता भिमदेव गव्हाणे सर्व माळेगाव खुर्द बारामती जि.पुणे यांचे विरुद्ध कायदेशीर फिर्याद देत आहे तसेच मोटार सायकल चे नुकसान झाले आहे म्हणून फिर्याद दिली त्यानुसंगाणे शाबीती केसची माहिती ता-30/8/22 खालीलप्रमाणे  बारामती तालुका पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजि नं.व.कलम -४४०/१७,भा द वीक,३०७,५०४,५०६,४२७,३४,सेशन केस नंबर- १६/१८  आरोपीचे नाव 1)भिमदेव रामा गव्हाणे, 2)राहुल भिमदेव गव्हाणे,3)दत्तात्रय भिमदेव गव्हाणे, रा माळेगाव खुर्द,ता बारामती जि पुणे 
 मे आर के देशपांडे सो यांच्या कोर्टासमोर सरकारी वकील -स्नेहल नाईक मँडम यांनी काम पाहिले, तर प्रभारी अधिकारी-एम के ढवाण पोलीस निरीक्षक बारामती तालुका पो स्टे यांच्या आदेशानुसार तपासी अधिकारी-सी बी बेरड पो स ई सद्या ए.पी.आय. पुणे शहर  ,कोर्ट अंमलदार -ए.जे. कवडे पो हवा ब नं ७४९ कोर्ट पैरवी अधिकारी- ASI नलावडे,जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी- API अर्जुन घोडेपाटील,केस अधिकारी --- स पो निरी वाय व्ही लंगुटे यांनी कामगिरी बजावली सदर आरोपींना मे कोर्ट यांनी भा द वी क ३२४,मध्ये दोषी धरून २ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा केली व प्रत्येकी २,०००/रू दंड केला व दंड न भरल्यास ६,महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

No comments:

Post a Comment