महिला सुरक्षितेच्या बाबतीत कायदा कडक होईल का? ९ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांचा सामूहिक बलात्कार..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 2, 2022

महिला सुरक्षितेच्या बाबतीत कायदा कडक होईल का? ९ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांचा सामूहिक बलात्कार..!

महिला सुरक्षितेच्या बाबतीत कायदा कडक होईल का? ९ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांचा सामूहिक  बलात्कार..!
मुंबई :-'बेटी बचाव, बेटी पडाव'चा नारा दिला जातोपरंतु बेटी सुरक्षित कधी होणार रोजच कुठेना कुठे महिलांवर व मुलीवर अत्याचार होत असल्याचे बातम्या प्रसिद्ध होत आहे मात्र कायदा कधी कडक होणार अशी संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे, नुकताच ताजे प्रकरण देशाची आर्थिक राजधानी मुंबईचे आहे.येथे एका ९ वर्षांच्या मुलीला तीन नराधमांनी आपल्या
वासनेची शिकार बनवले आहे. ही लाजीरवाणी घटना मुंबईतील भांडुप भागातील आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याचवेळी पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींचे वय ६२ वर्षे आणि ६५ वर्षे आहे.पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २०२० ते २२ जून २०२२ दरम्यान घडली, जेव्हा अल्पवयीन पीडितेने ही माहिती तिच्या आईला दिली होती.अल्पवयीन पीडितेकडून सर्व काही जाणून घेतल्याने आईच्या पायाखालची जमीनच सरकली.यानंतर तिने मुलीवर अत्याचाराची तक्रार घेऊन पोलिसात पोहोचली.
पीडितेच्या आईच्या तक्रारीच्या आधारे भांडुप
पोलिसांनी तीन जणांविरुद्ध कलम ३७६, ३७६ (एबी),३७६(२)(एन) आणि पोक्सो कलम ४,६,८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस फरार आरोपींच्या शोधात ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच तिसरा आरोपीही पकडला जाईल.

No comments:

Post a Comment