*अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची कराटे कलर बेल्ट परीक्षा संपन्न* बारामती: बारामती कराटे क्लबच्या खेळाडूंची कलर बेल्ट परीक्षा नुकतीच संपन्न झाली.यापैकी अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूलच्या 26 खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याने त्यांना प्रथम, दुसरा व तिसरा क्रमांक देण्यात आला. *अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थीनी अक्षदा बेलदार हिने येलो बेल्ट परीक्षेत 100 गुणांपैकी 90 गुण मिळवून उत्कृष्ट कामगिरी केल्याने परीक्षकांनी तिला प्रथम क्रमांक प्रदान केला त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.*
18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत वीरशैव मंगल कार्यालय, भिगवण रोड, बारामती या ठिकाणी *सेईको काई कराटे असोसिएशन इंडिया* च्या वतीने ही परीक्षा घेण्यात आली होती.
*बारामती कराटे क्लब व सेईको काई महाराष्ट्र राज्याचे सचिव व परीक्षक श्री. मिननाथ भोकरे सर यांच्या शुभहस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बेल्ट प्रदान करण्यात आले.*
*येलो बेल्ट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नांवे :-*
*मुली -* अंकिता परकाळे,आर्या तरटे,समृद्धी पवार,मरियम मुलाणी,क्रितिका कदम,सई कांबळे,श्रेया ओग,स्वराली राऊत,अनुष्का कावरे,भूमी नालंदे,राजगौरी पाटील,चैत्राली स्वामी,जान्हवी धायगुडे,अक्षदा बेलदार,
*मुले -* अर्णव चव्हाण, रुद्र पाटील,राजवर्धन सिताप,असीम शेख,मयुरेश पलंगे,हर्ष भोपळे,अथर्व लोणकर,हर्षल पोटे,मोहमदकैफ तांबोळी, आदित्य कणके,सिध्दार्थ धायगुडे, श्रेयस हिंगणे.
*परीक्षक म्हणून सेइको काई महाराष्ट्र, सातारा जिल्ह्याचे प्रशिक्षक श्री.धीरज कदम व राष्ट्रीय खेळाडू व भारतीय खेल प्राधिकरण (SAI) जबलपूरचा खेळाडू श्री.मंथन भोकरे यांनी काम पाहिले.सर्व विजेत्या खेळाडूंचे स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री मिलिंद शहा (वाघोलीकर) , सर्व संचालक मंडळ, स्कूलच्या प्राचार्या राखी माथूर , समन्वयिका स्मिता ढवळीकर तसेच बारामती कराटे क्लब यांनी हार्दिक अभिनंदन केले.*
No comments:
Post a Comment