श्री कन्हैयामित्र मंडळाच्यावतीने आराधी मंडळींना फराळाचे वाटप..!
बारामती:- कसबा येथील श्री कन्हैया मित्र मंडळाच्या वतीने नवरात्र निमित्त २०० आराधी मंडळींना फराळाचे वाटप करण्यात आले.
आराधी मंडळींमुळे नवरात्र जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने साजरा करण्यात येतो, देवीचे महात्म्य, पिढीजात चालत आलेला नवरात्र उत्सव याबद्दल अधिक माहिती होण्यास आज समाजाला अधिक मदत होते. देवीची गाणी, आरत्या, गोंधळाचे सादरीकरण या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोककला जपण्याचा प्रयत्न आराधी मंडळी करत असतात. खऱ्या अर्थाने आनंद उत्सव साजरा करण्यामध्ये आराधी मंडळींचा सहभाग महत्त्वाचा असतो. आराधी मंडळींचे योगदान लक्षात घेता श्री कन्हैया मित्र मंडळाच्या वतीने फराळाचे साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
यावर्षी मंडळाच्या माध्यमातून श्री संत सावतामाळी नगर, लक्ष्मीनारायण नगर, जामदार रोड याठिकाणी वाटप करण्यात आले.यापुढेही दरवर्षी मंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त गोरगरिब आराधी मंडळींना फराळ वाटप करण्याचे मंडळाच्या सदस्यांनी यावेळी सांगितले.
नवरात्र निमित्त उपवासासाठी आराधी मंडळींना फराळ वाटप करण्याची संकल्पना श्री कन्हैया मित्र मंडळाच्यावतीने राबवली जात आहे, हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे,यामुळे हिंदू धर्माची परंपरा जपण्यास अधिक हातभार लागत असल्याचे मत व्यक्त करत आराधी मंडळीनी मंडळाच्या सर्व सदस्यांचे आभार मानले.
या उपक्रमासाठी अमित(बापू)आगम,संतोष नेवसे,गणेश गायकवाड,शहाजी कदम, श्रीकांत गदादे,संतोष म्हैञै,राजू मुलाणी,पोपट मोरे,दिनेश गायकवाड, ,स्वप्निल भोसले,जयंत शिदे अमित झगडे यांचे योगदान लाभले.
No comments:
Post a Comment