बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार १० वर्षे सश्रम कारावास.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, October 1, 2022

बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार १० वर्षे सश्रम कारावास..

बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार १० वर्षे सश्रम कारावास..                                                                                बारामती:- महिलांवर व मुलीवर अत्याचार वाढत असल्याने त्याबाबत तक्रारी देखील वाढत आहे अशीच एक तक्रार दाखल झाली होती याबाबत माहिती अशी की,अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याच्या खटल्यात हनुमंत बापू शिंदे (रा. बारामती) यास येथील विशेष न्यायाधिश ए. ए. शहापुरे यांनी १० वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. २८ सप्टेंबर २०१५ रोजी ही घटना उघडकीस आली होती. बारामती शहरानजीकच्या एका वस्तीवर पीडित व आरोपी राहतात. १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आजारी असल्याने तिच्या वडिलांनी तिलाऔषधोपचारासाठी दवाखान्यात आणले होते.डॉक्टरांनी तपासून सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. सोनोग्राफी केली असता ही मुलगी सहा महिन्याची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कुटुंबियांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने सांगितले की, ती सरपण आणण्यासाठी नदीच्या कडेला गेली असताना शिंदे याने तिला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला.त्यानंतर वारंवार तिच्यावर अत्याचार करण्यात आला. घरात ही बाब सांगितली तर घरातल्या सगळ्यांना मारुन टाकीन, अशी धमकी त्याने दिल्याचे पीडितेने कुटुंबियांना सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी शिंदे
विरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी त्याच्याविरोधात धमकावणे, बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन सहाय्यक फौजदार बी. एम. खंडागळे यांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.दरम्यानच्या काळात या मुलीने एका बाळाला जन्म दिला होता. या खटल्यात सरकार पक्षातर्फे संदीप ओहोळ यांनी काम पाहिले. त्यांनी एकूण १३ साक्षीदार तपासले.पीडित मुलीची साक्ष व जबाब विश्वसनीय असून तिचे वडील, शाळेचे मुख्याध्यापक यांची साक्ष पुष्टी देणारी आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पुरावा, डीएनए यावरून पिडीत मुलीने जन्म दिलेले बाळ शिंदे याचेच असल्याचे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने शिंदे याला बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार १० वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड तर भादंवि कलम ५०६ अन्यये दोन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडितेला देण्याची शिफारस जिल्हा विधी सेवा समितीकडे करण्यात आली, याबाबत पोलीस स्टेशन  बारामती तालुका पोलीस स्टेशनला१) गुन्हा र नं-339/15 भा.द. वी. क , 376,(1)504,506 पोस्को कलम 5,6,२)   केस नं- 5/2016
३) आरोपी - हनुमंत बापू शिंदे  बारामती जि पुणे याच्यावर गुन्हा दाखल झाला होता तर श्री शहापुरे सो कोर्ट पुणे येथे कामकाज चालू होते,तपासी अंमलदार- सहाय्यक फौजदार बी ए खंडागळे सेवानिवृत्त यांनी केला,सरकारी वकील- मा संदीप ओहोळ यांनी काम पाहिले,तर ही केस अधिकारी सपोनी राहुल घुगे ,प्रभारी अधिकारी - श्री महेश ढवाण  बारामती तालुका पोलीस स्टेशन यांनी पाहिले व कोर्ट पैरवी कर्मचारी पोलीस हवालदार ए जे कवडे बक्कल नंबर 749 व बारामती सेशन कोर्ट पैरवी अंमलदार-- ASI नलावडे,जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी--API   अर्जुन घोडेपाटील यांनी सहकार्य केले.




  ‌

No comments:

Post a Comment