सर्व महापुरुष संयुक्त जयंती निमित्त 102 शालेय ड्रेसचे वाटप.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, October 3, 2022

सर्व महापुरुष संयुक्त जयंती निमित्त 102 शालेय ड्रेसचे वाटप..

सर्व महापुरुष संयुक्त जयंती निमित्त 102 शालेय ड्रेसचे वाटप.. 
सामाजिक योगदान देणाऱ्या विविध मान्यवरांना संविधान सन्मान पुरस्कार देऊन सन्मान 

बारामती:- सर्व महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त  102 शालेय विद्यार्थ्यांना ड्रेस, शालेय साहित्य, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, तसेच सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या वकील, डॉक्टर, पत्रकार, यांना संविधान सन्मान पुरस्कार, व सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक यांना समाज गौरव पुरस्कार देऊन बारामतीत आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
     येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात बारामती उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक गणेश इंगळे, मनसे प्रदेश उपाध्यक्ष ऍड सुधीर पाटसकर, दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप, भाजप प्रदेश सरचिटणीस सचिन आरडे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष एम डब्ल्यू जोशी, आंबेडकर चळवळीचे नेते नागसेन धेंडे, संजय गांधी निराधार समितीचे माजी अध्यक्ष किरण तावरे, सुखदेव हिवरकर, आदींच्या शुभहस्ते सदरील सत्कार सन्मान करण्यात आले.
    या जयंती उत्सवाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते व मुख्य संयोजन सुनील शिंदे, उमेश दुबे, साधू बल्लाळ, विश्वास लोंढे, निलेश जाधव यांनी केले होते 
       विधीक्षेत्रातील ॲड  बापूसाहेब शीलवंत,अँड.सचिन वाघ,अँड अजित बनसोडे,अँड अमृत नेटके,अँड. अमोल सोनवणे, अँड करीम बागवान,अँड स्वप्निल खरात, अँड अभय जगताप, अँड. गोविंद देवकाते यांना, तर वैद्यकीय क्षेत्रातून डॉक्टर सदानंद काळे, डॉक्टर कपिल सोनवणे, डॉक्टर स्वप्नील मुथा यांना, पत्रकारितेमधून तैनूर शेख, लक्ष्मण भिसे, शुभम अहिवळे, सुरज देवकाते, भारत तुपे, योगेश नालंदे,क्यामुद्दिन शेख,संतोष शिंदे यांना, तर सामाजिक क्षेत्रातून अनिकेत मोहिते, सुरज वनसाळे, नितीन शेलार, प्राध्यापक सुनिल लोखंडे सर, प्रा. रमेश मोरे, विशाल जाधव, प्रशांत कुचेकर, उत्पल शेलार, निलेश कोठारी, विजयराव डॅडी सोनवणे, वैभव धाइंजे यानां तर ज्येष्ठ नागरिक म्हणून टी.व्ही. मोरे, नागसेन धेंडे, कचर शिंदे, लक्ष्मण बगाडे, माणिकराव आडागळे, अनंत मोरे, नारायण खटके, नंदू गायकवाड, निवृत्त पोलीस अधिकारी गलगले, मुरलीधर जगताप आदिंना संविधान सन्मान ट्रॉफी, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
   यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रत्नप्रभाताई साबळे, तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संजय वाघमारे, कार्याध्यक्ष माऊली कांबळे, युवक जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रवींद्र सोनवणे आदींचा यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास बारामती बँकेचे माजी संचालक सुनील देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे , एडवोकेट हरीश तावरे, पत्रकार दत्ता सावंत, बापूराव सोलनकर, रिपब्लिकन पक्षाचे मधुकर मोरे आदींसह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय,पत्रकारिता, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संयोजक सुनील शिंदे यांनी केले तर श्री गणेश इंगळे, सुधीर पाटसकर, किरण तावरे, एडवोकेट करीन बागवान, साधू बल्लाळ यांनी मनोगतातून महापुरुषांच्या कार्याचा गौरव करीत सुत्य उपक्रमाचे स्वागत केले आभार प्रदर्शन निलेश जाधव यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक सलीम सय्यद यांनी केले

No comments:

Post a Comment