श्री छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये रयत शिक्षण संस्थेचा 103 वा वर्धापन दिन आणि महाभोंडला उत्साहात साजरा* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 4, 2022

श्री छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये रयत शिक्षण संस्थेचा 103 वा वर्धापन दिन आणि महाभोंडला उत्साहात साजरा*

*श्री छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये रयत शिक्षण संस्थेचा 103 वा वर्धापन दिन आणि महाभोंडला उत्साहात साजरा* 


बारामती:- रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती येथे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व समन्वय समिती सदस्य माननीय श्री सदाशिव बापूजी सातव यांच्या मार्गदर्शनाखाली रयत शिक्षण संस्थेचा 103 वा वर्धापन दिन आणि महाभोंडला उत्साहात साजरा केला .
     विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री बी एन पवार साहेब उपप्राचार्य श्री पी एन तरंगे साहेब पर्यवेक्षक श्री बी ए सुतार साहेब राशीन हायस्कूल चे उपप्राचार्य श्री जी.आर तावरे साहेब या मान्यवरांच्या उपस्थितीत कर्मवीर पुतळ्यास विनम्र अभिवादन करून कर्मवीरांच्या व लक्ष्मीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील उपशिक्षिका  सौ.सुनिता कोकरे यांनी डॉक्टर पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी सांगताना त्यांनी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जीवनातील भाकरीच्या पेढ्यांचा प्रसंग विद्यार्थ्यांसमोर मांडला कर्मवीर आण्णांची विद्यार्थ्यांनी गरीबीतून प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घ्यावा हे या   प्रसंगातून त्यांनी सांगितले .
           तसेच माननीय प्राचार्य श्री बी. एन .पवार साहेब यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनातील संस्कृत विषयातील प्रसंग विद्यार्थ्यांसमोर मांडला आणि शिक्षणाविषयीची ओढ तळमळ कशाप्रकारे असावी ही माहिती दिली.महाभोंडल्याच्या निमित्ताने सौ प्रियांका कदम यांनी आपल्या परंपरा आणि त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन यांची सांगड कशाप्रकारे आहे हे सांगितले सर्व विद्यार्थ्यांनी , कार्यरत महिला यांनी महाभोंडल्याचा आनंद घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रमेश गोळे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक श्री बी ए सुतार सर यांनी मानले.

No comments:

Post a Comment