हादरवणारी घटना..14 वर्षाच्या बहिणीने 8 वर्षाच्या बहिणीला गळ्यावर आणि हातावर ब्लेडने वार करत संपवल..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, November 28, 2022

हादरवणारी घटना..14 वर्षाच्या बहिणीने 8 वर्षाच्या बहिणीला गळ्यावर आणि हातावर ब्लेडने वार करत संपवल..!

हादरवणारी घटना..14 वर्षाच्या बहिणीने 8 वर्षाच्या बहिणीला गळ्यावर आणि हातावर ब्लेडने वार करत संपवल..!
जालना:- महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यामधून  हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे,घनसावंगी तालुक्यातील गुंजमध्ये 14 वर्षाच्या बहिणीने लहान बहिणीची हत्या केल्याचं
समोर आलं आहे. ईश्वरी रमेश भोसले असं मृत चिमुकलीचं नाव आहे.नेमकं  प्रकरण काय आहे याबाबत माहिती पुढे आली,ईश्वरीला शिक्षणासाठी तिच्या काकांकडे ठेवलं होतं, ईश्वरी
नेहमीप्रमाणे सकाळी अंघोळीला गेली. त्यानंतर तिच्यामागे मोठी बहिणही गेली. बाथरूममध्ये तिच्या गळ्यावर आणि हातावर ब्लेडने वार केले.या हल्ल्यामध्ये चिमुकली ईश्वरी गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला एका रूग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तिला तपासल्यावर मृत घोषित केलं होतं.याबाबत तपासात पोलिसांना संशय आला होता की, ईश्वरीवर दुसऱ्या लहान मुलीने हल्ला केला आहे. कारण मोठ्या बहिणीने तिला मारल्यावर बाथरूममध्ये पाणी ओतलं.त्यानंतर जाऊन तिने कपडेही बदलले. मात्र तिच्या पायाचे ठसे घरात उठले होते.दरम्यान, पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलं आहे. तिन शूल्लक कारणावरून हत्या केल्याचं समजत आहे. या घटनेमुळे हादरून गेले आहे.

No comments:

Post a Comment