अल्पवयीन मुलांना मोटरसायकल चालवण्यास देणाऱ्या पालकाविरुद्ध खटले दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 22, 2022

अल्पवयीन मुलांना मोटरसायकल चालवण्यास देणाऱ्या पालकाविरुद्ध खटले दाखल..

अल्पवयीन मुलांना मोटरसायकल चालवण्यास देणाऱ्या पालकाविरुद्ध खटले दाखल..

बारामती:- शहरामध्ये कॉलेज व महाविद्यालयांच्या समोर अनेक अल्पवयीन मुले गाड्या फिरवताना निदर्शनास येत असतात. या मुलांकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना पालक त्यांना गाड्या चालवण्यास देत असतात.त्यामुळे सदरच्या विद्यार्थ्यावर कारवाई करून उपयोग नाही त्यासाठी त्यांच्या पालकांवर कारवाई करावी ही कायद्यात तरतूद आहे. तरी गेल्या दोन दिवसांमध्ये बारामती शहर वाहतूक शाखेतर्फे एकूण 18 मुलांच्या पालकांवर वाहतूक अधिनियम अन्वये खटले दाखल करून कोर्टात पाठवण्यात आलेले आहेत. त्यांना कमीत कमी पाच हजार रुपये दंड होईल. याही पुढे त्यांच्यावर सतत कारवाई केली जाणार आहे. सदरची कारवाई माननीय अपर पोलीस अधीक्षक अनंत भोईटे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब जाधव. चालक कांबळे तसेच वाहतूक शाखेकडील सर्व पुरुष व महिला कर्मचारी यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment