माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात संचालक (प्रशासन) पदी हेमराज बागुल रुजू* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, November 17, 2022

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात संचालक (प्रशासन) पदी हेमराज बागुल रुजू*

*माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात संचालक (प्रशासन) पदी हेमराज बागुल रुजू*

    मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील संचालक (प्रशासन) या पदाचा कार्यभार हेमराज बागुल यांनी आज मंत्रालयात स्वीकारला. विभागाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांच्या उपस्थितीत संचालक (वृत्त व जनसंपर्क) गणेश रामदासी यांच्याकडून श्री. बागुल यांनी पदभार स्वीकारला.

            याप्रसंगी उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे, उपसंचालक (प्रशासन) गोविंद अहंकारी, उपसंचालक (प्रकाशने) अनिल आलुरकर, उपसंचालक (प्रदर्शने) सीमा रनाळकर आदींनी पुष्पगुच्छ देवून श्री. बागुल यांचे स्वागत केले.

            महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभाग आणि औरंगाबाद-लातूर विभागाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही श्री. बागुल यांच्याकडे देण्यात आला आहे. श्री. बागुल यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी तसेच महासंचालनालयात प्रकाशने, महान्यूज, वृत्त आदी शाखांमध्ये त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. शासकीय सेवेत येण्यापूर्वी श्री. बागुल यांनी पत्रकारितेत योगदान दिले आहे. तसेच साहित्यविषयक विविध पुरस्कारांनी श्री. बागुल यांना सन्मानित करण्यात आले आहे.
                  

No comments:

Post a Comment