पोलिसांची दमदार कामगिरी,२२ गंभीर गुन्ह्यातील वॉन्टेड अखेर केला जेरबंद.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 16, 2022

पोलिसांची दमदार कामगिरी,२२ गंभीर गुन्ह्यातील वॉन्टेड अखेर केला जेरबंद..

पोलिसांची दमदार कामगिरी,२२ गंभीर गुन्ह्यातील वॉन्टेड अखेर केला जेरबंद..                     बारामती :-गुन्हेगारी चे प्रमाणात वाढ होत असताना पोलिसांनी आत्ता मोहीम हाती घेतली असून अट्टल गुन्हेगार पकडून जेरबंद करायचे याच पार्श्वभूमीवर नुकताच मोक्का, खून, दरोडा,जबरी चोरी यासारख्या २२ गंभीर गुन्ह्यात फरार असलेलल्या लखन उफ महेश पोपट भोसले (रा.वडगाव जयराम स्वामी, ता. खटाव, जि. सातारा) याला जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा, वडगाव निंबाळकर व बारामती तालुका पोलिसांना यश आले. बारामती तालुक्यातील घाडगेवाडी येथे भोसले याला ताब्यात घेण्यात आले.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, अशोक शेळके, वडगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश जगदाळे, अमित सिद पाटील, अभिजित एकशिंगे, स्वप्निल अहिवळे,मुकुंद कदम, रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे,
वडगावचे हिरालाल खोमणे, हृदयनाथ देवकर, दादा कुंभार व बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.लखन भोसले हा घाडगेवाडीत आला असल्याची माहिती हवालदार अभिजित एकशिंगे व स्वप्निल अहिवळे यांना मिळाली होती. त्यानुसार पथके तयार करून त्याचा शोध सुरु करण्यात आला. मंगळवारी(दि. १५) रोजी तो घाडगेवाडी येथील एका घरासमोर उभा होता. पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जावू लागला. पोलिसांनी त्याला एक किमीपर्यंत
पाठलाग करत ताब्यात घेतले.तब्बल २२ गुन्हे दाखल लखन भोसले याच्यावर दहीवडी (जि. सातारा)पोलिस ठाण्यात घरफोडी, जबरी चोरीचे तब्बल १५ गुन्हे दाखल आहेत. याशिवाय म्हसवड (जि. सातारा)पोलिस ठाण्यात दरोड्याचा एक व वडूज पोलिस ठाण्यात घरफोडीचा एक तर पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात मोक्कासह दरोडा, घरफोडी, जबरी चोरी असे तीन, बारामती तालुका पोलिस ठाण्यात खूनासह जबरी चोरीचा एक, इंदापूर पोलिस ठाण्यात दरोड्याचा एक गुन्हा दाखल आहे.पोलीस अजून तपास करीत असून गुन्हेगारी संपविण्याचा प्रयत्न करीत आहे.

No comments:

Post a Comment