हजरत टीपू सुल्तान यांच्या जयंती निमित्त मुलांना खाऊ वाटप..ह. अब्बास अली सामाजिक प्रतिष्ठानचा कौतुकास्पद उपक्रम...!
बारामती (दि:२०):- ह. अब्बास अली सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने भारताचे प्रथम मिसाइल मैन तथा शहीद ए वतन फतेह अली खान हजरत टीपू सुल्तान(र.अ.) यांची जयंती ह.अब्बास अली चौक येथे (दि:२०) रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.हजरत टीपू सुल्तान यांच्या जयंती निमित्त पत्रकार संतोष जाधव, पत्रकार राजू कांबळे, पत्रकार सूरज देवकाते, पत्रकार सिकंदर शेख, पत्रकार संदीप आढाव यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिवादन नंतर हजरत टीपू सुल्तान यांचे विचारधारेचा ऊपस्थितांना परिचय करून देण्यात आला. जयंती निमित्त लहान मुलांना खाऊ तसेच बिस्कीट वाटप पत्रकार बांधवांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी ह.अब्बास अली सामाजिक प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष दाऊद शेख , राजू (बाबूभाई) शेख , रज्जाक शेख, मेहमूद शेख, करीम शेख, महेबुब शेख, हुसेन शेख, कैयश शेख ,अजर ईनामदार, फिरोज शेख, सोहेल शेख, जावेद शेख, तोसिफ शेख, मुस्तकीम शेख तसेच ह. अब्बास अली सामाजिक प्रतिष्ठान चे कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment