वादग्रस्त वक्तव्य.. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकल्या प्रकरणी, बक्षीस जाहीर प्रकरणातील बारामतीत 15 जणांवर गुन्हा दाखल..
बारामती:- पिंपरीत मंत्री चंद्रकांत पाटलांच्या चेहऱ्यांवरच शाई फेकण्यात आली त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटील यांना टार्गेट करण्यात आलं. आपल्या नियोजित
कार्यक्रमानिमित्त चंद्रकांत पाटील पिंपरीत आले होते.त्याचवेळी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटलांवर शाई फेकली. प्रकरणात बारामती कनेक्शन पिंपरीत मंत्री चंद्रकांत पाटलांच्या चेहऱ्यांवरच शाई फेकण्यात आल्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन चंद्रकांत
पाटील यांना टार्गेट करण्यात आलं. आपल्या नियोजित कार्यक्रमानिमित्त चंद्रकांत पाटील पिंपरीत आले होते.त्याचवेळी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटलांवर शाई फेकली. प्रकरणात बारामती कनेक्शन उघड झालेय.
दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यनंतर बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे राष्ट्रवादीचे सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड व कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून जो कोणी चंद्रकांत पाटील यांना काळे फासण्याचे
काम करेल. त्याला 51 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे चिथावणीखोर भाषण सोशल मीडियावर व्हायरल केले होते. असे चितावणीखोर भाषण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या 14 कार्यकर्त्यांवर बारामतीत गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. पाटील यांच्यावर झालेल्या शाई फेक हल्ल्यानंतरही हे बक्षीस लवकरच मनोज बरकडेला दिले जाईल हा व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला होता.या संदर्भात अविनाश मोटे व भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे सह इतरांनी शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बारामती पोलिसांनी भारतीय दंड विधान संहिता 353,109,143,149,504,506 नुसार ऋषिकेश गायकवाड मनोज गरबडे यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास बारामती पोलीस करीत आहेत.
No comments:
Post a Comment