पुणे ग्रामीण विभागा मार्फत सुकन्या खाते उघडण्यासाठी विशेष शिबीराचे आयोजन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, December 19, 2022

पुणे ग्रामीण विभागा मार्फत सुकन्या खाते उघडण्यासाठी विशेष शिबीराचे आयोजन

पुणे ग्रामीण विभागा मार्फत सुकन्या खाते उघडण्यासाठी विशेष शिबीराचे आयोजन
पुणे:- श्री अभिजित शिंदे, सरपंच, शिंदेवाडी यांच्या सहकार्याने शिंदेवाडी ता. भोर जि. पुणे येथे TATA AIG/Bajaj Allianz अपघात विमा व सुकन्या समृधी योजने अंतर्गत खाती काढण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरामध्ये श्री अभिजित शिंदे, सरपंच शिंदेवाडी यांच्या वाढदिवसानिमित त्यांनी ७५ मुलींची स्वखर्चानी सुकन्या समृद्धी  उघडले तसेच दोन मुलींच्या जन्मानंतर
कुटुंबनियोजन केलेल्या दोन कुटुंबातील मुलींच्या नावाने प्रत्येकी रु.१०,०००/- राष्ट्रीय बचत
पत्र घेतली. या शिबिराच्या निमित्याने गावातील नागरिकांचे इंडिया पोस्ट पेमेंट बँके चे खाते
उघडून TATA AIG कंपनीचा रु.३९९/- मध्ये रुपये दहा लाख व Bajaj Allianz कंपनीचा
रु.३९५/- मध्ये रुपये १० लाख असा एकत्रित रु. ७९५/- मध्ये रुपये २० लाखांचा अपघाती
विमा उतरवण्यात आला.
या स्तुत्य उपक्रमासाठी श्री अभिजित शिंदे यांना खेड शिवापूर बाग चे सब पोस्टमास्तर
श्री अनिल जोशी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
रुपये ७९५/- मध्ये २० लाखांचा अपघाती विमा हा अत्यंत कमी रकमेत उपलब्ध आहे व
त्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँके चे खातेधारक व आधार कार्ड नंबर असणे अनिवार्य आहे तरी
आजच जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन किवां पोस्टमनद्वारे इंडिया पोस्ट पेमेंट बँके चे खाते उघडून या अपघाती विम्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री बी पी एरंडे, अधीक्षक डाकघर, पुणे
ग्रामीण विभाग यांनी केले आहे.त्याच प्रमाणे श्री एरंडे यांनी असेही सांगितले की, जर जनतेकडून मागणी करण्यात आली तर गावांमध्ये, रहिवासी सोसायटया, विविध कार्यकारी सोसायटया, पत संस्था,स्वयंसेवी संस्था, अंगणवाड्या, बालवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे इ. ठिकाणी आधार
सुकन्या, IPPB खाते उघडणे व TATA AIG//Bajaj Allianz विमा उघडणे इ. करिता कॅम्पचे आयोजन केल्यास पुणे ग्रामीण विभागा मार्फत हवे ते सहकार्य करण्यात येईल.

No comments:

Post a Comment