अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या तरुणाला माळेगांव पोलिसांनी ठोकल्या बेड्या. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 16, 2025

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या तरुणाला माळेगांव पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या तरुणाला माळेगांव पोलिसांनी ठोकल्या बेड्या..
बारामती:- बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची माहिती प्राप्त होताच अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन माळेगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं 305/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 137(2) प्रमाणे दिनांक 04/12/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्यातील अपहृत अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी माळेगांव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी लागलीच एक तपास पथक तयार करुन त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर, सहा.फौजदार संजय मोहिते, पो.कॉ.अमोल वाघमारे, पो.कॉ.जयसिंग कचरे यांची नेमणूक केली व अपहृत मुलीचा शोध सुरु करण्यात आला.       
        सदर तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी अल्पवयीन मुलीस बीड येथे घेऊन गेला असल्याचे निष्पन्न झाल्याने माळेगांव पोलीस स्टेशनचे तपास पथक तात्काळ बीड येथे रवाना करण्यात येऊन अल्पवयीन मुलीस व आरोपीला बीडमधून ताब्यात घेण्यात आले. तपासामध्ये आरोपी नामे स्वप्निल उर्फ सोपान विश्वंबर पवार, वय 21 वर्षे, रा.मांडवजाळी, ता.जि.बीड याने सदर अल्पवयीन मुलीला तिच्याशी लग्न केल्याचे भासवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्यास बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यांतर्गत कलम वाढ करुन आरोपीस अटक करण्यात आले. आरोपीस मा.न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने आरोपीला दिनांक 16/12/2025 पर्यंत पोलीस कोठडी दिली असून अल्पवयीन मुलीस तिच्या आईच्या ताब्यात सुखरुप सुपूर्त करण्यात आले. 
         सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर करीत असल्याची माहिती माळेगांव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी दिली.

No comments:

Post a Comment