लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कर्जमाफीसाठी बारामतीत आंदोलन... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, December 10, 2022

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कर्जमाफीसाठी बारामतीत आंदोलन...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कर्जमाफीसाठी बारामतीत आंदोलन...
बारामती:- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या कर्जाची कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी झोपडपट्टी सुरक्षा दल व मांगगारोडी समाज संघटना, बारामती शहर तालुका यांच्या वतीने प्रशासकीय भवना समोर हलगीनाद, करून आंदोलन करण्यात आले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून मातंग समाज व त्याच्या पोट जातीतील 12 पोटजातींना आर्थिक, दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आर्थिक पुरवठा, कर्जाच्या माध्यमातून केला जातो, सन 2013 साली साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळाकडून मांग गारुडी या जातीसाठी एक एक लाख रुपयाची कर्जप्रकरणी करून पतपुरवठा केला होता परंतु बेरोजगारी ,कोरोना संकट, व इतर कारणांमुळे हे पैसे परत फेडणे समाजातील लोकांना जमले नाही,त्यामुळे साधारणतः दहा वर्षानंतर महामंडळाकडून पुन्हा एकदा, आर्थिक पतपुरवठा चालू झाला आहे परंतु जुन्या लोकांनी घेतलेल्या कर्जामुळे सध्या सुशिक्षित लोकांना याचा फायदा होताना दिसत नाही त्यामुळे सुशिक्षित असूनही व काहीतरी करण्याची इच्छा असतानाही सुशिक्षित तरुण बेरोजगार होत आहे यामुळे पूर्वी केलेले जे कर्ज वाटप होते, ते कर्ज माफ करून समाजातील नवीन तरुणांना कर्ज वाटप करण्यात यावे अशी मागणी मांगगारुडी समाज व झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने, प्रशासनाकडे करण्यात आली होती व आज रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता यावेळी आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी झोपडपट्टी सुरक्षा दल व मांग गारुडी समाज बारामती शहर तालुका यांच्या वतीने प्रशासकीय भवना समोर हलगीनाद आंदोलन करून, आपल्या भावना व्यक्त करण्यात आल्या, यावेळी प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार श्री करे यांनी निवेदन स्वीकारून आपल्या सर्व मागण्या शासन दरबारी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू अशी,  ग्वाही त्यांनी दिली यावेळी तानाजी पाथरकर, गजानन गायकवाड, अभिमन्यू लोंढे ,सचिन सकट, बापू पाथरकर, शरद पाथरकर, लखन पाथरकर दिगंबर पाथरकर, गणेश गायकवाड, रोहिदास सकट, दत्तू कांबळे, लाला अडागळे, इत्यादी प्रमुख कार्यकर्ते हजर होते

No comments:

Post a Comment