झैनबिया स्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, December 5, 2022

झैनबिया स्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड*

*झैनबिया स्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड*

कटफळ (ता.बारामती):- अब्बास मोहम्मद हुसेन एज्युकेशन ट्रस्ट संचलित झैनबिया स्कूलच्या 13 पैकी  6 विद्यार्थ्यांचा तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत यश मिळविले असून त्यांचे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
          शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे व बारामती कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे तालुकास्तरीय कराटे स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन मा.श्री.किरण दादा गुजर मा.ज्येष्ठ नगरसेवक बा.ण.प., मा.श्री.संभाजीनाना होळकर अध्यक्ष बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मा.श्री.अविनाश लाड स्वी.सदस्य जि.की.स.समिती पुणे बारामती, मा.श्री.अनिल सातव,बारामती तालुका क्रीडा अधिकारी, मा.श्री.राजेंद्र खोमणे अध्यक्ष,बारामती तालुका क्रीडा शिक्षक संघटना यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. 
          या स्पर्धेत 14 वर्षे व 17 वर्षे वयोगटात विविध वजन गटांमध्ये प्राविण्य मिळविले. मुलांमध्ये कु.सार्थक चव्हाण, कु.श्रेयश बिटके, कु.मोहसीन तांबोळी तर मुलींमध्ये:- सायली मानसवर, इकरा सय्यद, समीक्षा नाईक यांनी प्रथम विजेतेपद मिळविले व त्यांची बारामती तालुक्यातून जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाली. द्वितीय क्रमांक कुलसुम खान तसेच तृतीय क्रमांक संस्कृती मुळे, चैतन्य गिरमे व मानस नाईकडे यांनी मिळविले.
          स्कूलच्या प्राचार्या. इन्सिया नासिकवाला यांनी सर्व मार्गदर्शक क्रीडाशिक्षक आप्पासाहेब देवकाते, विशाल हाडंबर, पालक यांचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment