*10 लाखाचा गांजा जप्त,बारामती तालुका पोलीस स्टेशनची आणखी एक धडाकेबाज कामगिरी*; *तर बारामती मधील गांजा विकनाऱ्यावर कारवाई कधी?*
बारामती:- दि.28/12023 रोजी वाजताच्या सुमारास बारामती तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री प्रभाकर मोरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार मधून इंदापूर - बारामती मार्गे सासवडला गांजा विक्री साठी जाणार आहे. अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री प्रभाकर मोरे यांनी तात्काळ वरिष्ठांना सदर बाबत माहिती देऊन आपले अधीन असणारे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना या बाबत सूचना देऊन रुई पाटी जवळ रुई गाव येथे रोडवर नाकाबंदी लावली. सदर वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे हे देखील उपस्थित होते रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार क्र.MH12 JS 0090 ही रुई गावातून रुई पाटीकडे येत असताना पोलिसांनी तिला थांबून चेक केले असता तिच्या डीकी मध्ये सुमारे जवळपास 10 लाख रुपये किमतीचा सुमारे 50 किलो गांजा मिळून आलेला आहे. सदरचा गांजा विक्रीसाठी घेऊन जाणारे आरोपी नामें. सचिन दिलीप रणवरे वय 35 वर्षे रा हिवरकर मळा सासवड ता पुरंदर जि पुणे व 2) सुनिता प्रताप चव्हाण वय 35 वर्षे रा सणसवाडी ता शिरुर जि पुणे मुळ रा माहुरगड ता पुसद जि नांदेड यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 10 लाख किमतीचा गांजा तसेच 5 लाख रुपये किमतीचा स्विफ्ट कार असा एकूण 15 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, त्यांनी सदरची कार्यवाही करून घेतली.
सदरची कामगिरी मा. श्री अंकित गोयल सो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामिण, मा.श्री आनंद भोईटे सो अपर पोलीस अधिक्षक बारामती, मा. श्री गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग बारामती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सपोनि योगेश लंगुटे, राहुल घुगे सहाय्यक फौजदार साळवे, पो. हवा. राम कानगुडे, सुरेश दडस,अतुल पाटसकर , राजेंद्र जाधव महिला पोलीस हवालदार खंडागळे, आशा शिरतोडे. पोलीस नाईक अमोल नरुटे बापू बनकर, पोलीस कॉन्स्टेबल संतोष मखरे , दीपक दराडे ,दत्ता मदने शशिकांत दळवी यांनी केली आहे. पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment