बापरे...खूनाचं सत्र सुरूच?तरुण युवकाचा खून.. युवक बारामतीचा...! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, January 28, 2023

बापरे...खूनाचं सत्र सुरूच?तरुण युवकाचा खून.. युवक बारामतीचा...!

बापरे...खूनाचं सत्र सुरूच?तरुण युवकाचा खून.. युवक बारामतीचा..!
कुरकुंभ :-पुणे जिल्ह्यात कुणाचं सत्र सुरू आहे की काय?अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे नुकताच एकाच कुटुंबातील सात जणांचा खून झाल्याची माहिती ताजी असतानाच पुन्हा दौंड तालुक्यातील  जिरेगावमध्ये एका युवकाचा मृतदेह आढळून आला असून त्याचा खून
करून मृतदेह जिरेगाव (ता. दौंड) हद्दीत आणून
टाकण्यात आला असल्याचा संशय व्यक्त
करण्यात येत आहे.खून झालेल्या युवकाचे नाव प्रफुल उर्फ मोण्या राजेंद्र बारवकर रा खंडोबा नगर बारामती वय साधारण 25 ते 30 वर्षे असण्याचा अंदाज असून तो बारामती मधील असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांत खून करून मृतदेह दौंड तालुक्यात आणून टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे पोलिसांनी सतर्क होऊन हायवे, मुख्य रस्ते, नदी,डोंगराळ भाग अश्या ठिकाणी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे. जेणेकरून संशयीत वाहने तपासून घडणारे अघटित प्रकार वेळीच रोखण्यात यश येऊ शकेल.
सदर युवकाच्या डोक्यात व छातीवर गंभीर इजा
असल्याचे प्रथम दर्शनी दिसत असून ही व्यक्ती
बारामतीच्या खंडोबानगर येथील असू शकते अशी शक्यताही ओळख पटविणाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.घटनास्थळी काही वेळातच बारामतीचे अॅडीशनल एस.पी. तसेच डी.वाय.एस.पी हे माहिती घेण्यासाठी पोहचत असल्याचे समजत असून अधिक तपास चालू आहे.

No comments:

Post a Comment