प्रभाग क्र.13 चे नगरसेवक दारु विक्रेत्याकडून 90 हजार रुपयांची लाच घेताना अॅन्टीकरप्शनच्या जाळ्यात... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 18, 2023

प्रभाग क्र.13 चे नगरसेवक दारु विक्रेत्याकडून 90 हजार रुपयांची लाच घेताना अॅन्टीकरप्शनच्या जाळ्यात...

प्रभाग क्र.13 चे नगरसेवक दारु विक्रेत्याकडून 90 हजार रुपयांची लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात...
 यवतमाळ :-देशीदारु दुकानाविरुद्ध तक्रार केली  परवानाधारक दारु दुकानाविरुद्ध केलेली तक्रार मागे घेण्यासाठी 90 हजार रुपये लाच घेताना नगरपंचायत नगरसेवकाला यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून
रंगेहात पकडले. यवतमाळ एसीबीने ही कारवाई
बुधवारी (दि. 18) दुपारी मारेगाव येथे केली. अनिल उत्तमराव गेडाम (वय 45, रा. मारेगाव) असे लाच स्वीकारणाऱ्या नगरसेवकाचे नाव आहे.अनिल गेडाम हे प्रभाग क्र. 13 चे प्रतिनिधीत्व करतात.गेडाम यांनी परवाना असलेल्या किरकोळ देशीदारु दुकानाविरुद्ध तक्रार केली आहे. ही तक्रार मागे घेण्यासाठी गेडाम यांनी दुकानदाराकडे 90 हजार रुपये
लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य
नसल्याने त्यांनी यवतमाळ एसीबीकडे  तक्रार केली. पथकाने 10 जानेवारी रोजी पडताळणी केली असता तक्रार मागे घेण्यासाठी
नगरसेवक अनिल गेडाम यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले,यवतमाळ एसीबीच्या पथकाने बुधवारी (दि. 18 )मारेगाव येथे सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 90 हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारताना नगरसेवक अनिल गेडाम यांना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.गेडाम यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती
परिक्षेत्र पोलीस अधिक्षक मारुती जगताप अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे, उप अधीक्षक शैलेश सपकाळयांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनायक कारेगावकर,ज्ञानेश्वर नालट, जमादार अब्दुल वसीम, महेश वाकोडे,सचिन भोयर, सुधीर कांबळे, राहुल गेडाम यांनी केली.

No comments:

Post a Comment