*विकसित बारामती बरोबरच भ्रष्टाचारमुक्त,भयमुक्त बारामती करायची आहे* - नवनिर्वाचित जिल्हा नियोजन सदस्य पांडुरंगमामा कचरे.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 18, 2023

*विकसित बारामती बरोबरच भ्रष्टाचारमुक्त,भयमुक्त बारामती करायची आहे* - नवनिर्वाचित जिल्हा नियोजन सदस्य पांडुरंगमामा कचरे..

*विकसित बारामती बरोबरच भ्रष्टाचारमुक्त,भयमुक्त बारामती करायची आहे* - नवनिर्वाचित जिल्हा नियोजन सदस्य पांडुरंगमामा कचरे..

बारामती:-बारामतीचे नाव महाराष्ट्र आणि देशामध्ये एक विकसित बारामती म्हणून घेतले जाते हे जरी खरे असले तरी बारामतीचा सर्वांगीण विकास होणे अद्याप बाकी आहे आणि बारामतीचा विकास होत असताना,समतोल व समांतर विकास अजूनही  झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे.काही भागाचा व काही कुटुंबांचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्याची चीड सर्वसामान्य माणसांमध्ये वाढत आहे.अजून काही गावात मूलभूत गरजा रस्ते ,लाईट, पाणी, शिक्षण, स्मशानभूमीपासूनही बारामती वंचित असल्याचे आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचे मुख्य कारण आहे बारामतीमध्ये होत असणारा प्रचंड मोठा भ्रष्टाचार,बारामती हे महाराष्ट्राच्या राजकारणातील भ्रष्टाचाराची पंढरी व आगार आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही असे प्रतिपादन नवनिर्वाचित जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य कचरे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. 
बारामतीमध्ये शहर आणि ग्रामीणमध्ये दरवर्षी तीन हजार कोटी एवढा शासकीय निधी येत असतो म्हणजे पाच वर्षांमध्ये पंधरा हजार कोटी बारामती तालुक्यासाठी निधी येत असतो परंतु प्रत्यक्षात हे पैसे वेगवेगळ्या मार्गाने इमारती बांधणे आणि पाडणे प्रचंड मोठा भ्रष्टाचार करून काही लोकांच्या मध्येच वाटप केले जाते असा आरोप त्यांनी केला आहे. बारामतीचा भ्रष्टाचार थांबवण्यासाठीच माझी निवड झालेली आहे त्यामुळे  इथूनपुढे विकसित बारामतीसाठी भारतीय जनता पार्टी कटीबद्ध आहेच परंतु भ्रष्टाचार व भयमुक्त बारामती करण्यासाठी आम्ही 100% योगदान देणार असल्याचे भारतीय जनता पार्टीच्या सत्कार मेळाव्यामध्ये कचरे व पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवले आहे. 
भाजपा पूर्ण ताकतीने बारामतीचा विकासाला साथ देऊन येणाऱ्या काळात मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी मिळणार असल्याचे संकेत यावेळेस पुणे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी सांगितले.
पांडुरंगमामा कचरे यांची जिल्हा नियोजन मंडळावरती सदस्य म्हणून निवड झाल्यामुळे बारामती तालुक्यामध्ये  सर्वसामान्य नागरिकांमध्ये अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. सर्वसामान्यांना सन्मान व न्याय मिळेल अशा अपेक्षा लोकांना आहेत.
*मल्हार क्लबच्या माध्यमातूनही पांडुरंगमामा कचरे यांच्या सत्काराचा आयोजन करण्यात आले होते यावेळेस अध्यक्षस्थानी ॲड.विजयराव मोरे होते. या कार्यक्रमाचे आयोजन ॲड. गोविंद देवकाते,बापूराव सोलंनकर ,लक्ष्मण घोळवे यांनी केले होते*.

भाजपा कार्यालयात पृथ्वीराज बापू जाचक यांच्या अध्यक्षतेखाली सत्काराचा कार्यक्रम पार पडला, यावेळेस पुणे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, तानाजी बापू थोरात,शहराध्यक्ष सतीश फाळके, डॉ.अर्चना पाटील,सचिन साबळे,ॲड.ज्ञानेश्वर माने,दीपक काटे,राजेश कांबळे उपस्थित होते. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.गोविंद देवकाते,सरचिटणीस प्रमोद खराडे,सरचिटणीस प्रमोद डिंबळे व राजेश कांबळे यांनी केले होते.

No comments:

Post a Comment