तुला जास्त माज आला का, तूझा माज उतरवतो म्हणत टोळक्याने केला कोयत्याने वार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 16, 2023

तुला जास्त माज आला का, तूझा माज उतरवतो म्हणत टोळक्याने केला कोयत्याने वार..

तुला जास्त माज आला का, तूझा माज उतरवतो म्हणत टोळक्याने केला कोयत्याने वार..                                                                  पुणे :- कोयता गॅंग प्रकरण गाजत असतानाच पुणे येथे गेल्या काही महिन्यांपासून कोयता गँगवर सुरू झाल्याचे दिसत आहे असे असताना पोलीस यावर कडक कारवाई करीत असताना पुन्हा कोयत्याने वार केल्याची घटना पुढे आली,भावाला मारहाण का केली, अशी विचारणा करुन तूझा माजच उतरवतो, असे म्हणून चौघांनी रिक्षाचालकावर कोयत्याने सपासप वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी खडक पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अजय रामप्पा बॅगरी (वय २१), शैलेश ऊर्फ साहील रामप्पा बॅगरी (वय २१), अनिकेत व्यंकटेश कोळी (वय २१) आणि भरत व्यंकटेश कोळी (वय १८,सर्व रा. लोहियानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अजय, शैलेश आणि भरत हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.याबाबत प्रेम अनिल पाटोळे (वय २६, रा. पिंपळमाळा,कासेवाडी) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २३/२३)
दिली आहे. ही घटना लोहियानगरमधील अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोर शनिवारी रात्री साडेदहा वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम पाटोळे हे रिक्षाचालक आहेत. आरोपी हे फिर्यादीच्या ओळखीचे आहेत.
शनिवारी रात्री ते अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोर असताना अनिकेत कोही याने फिर्यादीला तू माझा भाऊ भरत कोळी याला मारहाण का केली अशी विचारणा करुन
शिवीगाळ केली.तेव्हा फिर्यादीने शिवीगाळ का करता, असे विचारल्यावर त्यांनी तला जास्त माज आला का, आज तुझा माजच उतरवतो, असे बोलून कोयता बाहेर काढून फिर्यादीच्या
डोक्यावर वार केला.तेव्हा फिर्यादीने डावा हात आडवा धरला. तो वार फिर्यादीच्या हाताचे बोटावर, दंडावर बसला.अनिकेत याने कोयत्याने फिर्यादीच्या पाठीवर व डोक्यावर कोयत्याने मारहाण केली.फिर्यादी तेथून पळून जाऊ लागले, तेव्हा शैलेश व भरत याने लाकडी बांबुने त्यांना मारहाण केली.पोलिसांनी चौघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक विटे तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment