बारामतीत 'बहुजन प्रेरणा' पुस्तकालयाचे वामन मेश्राम यांच्या हस्ते उदघाटन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, January 15, 2023

बारामतीत 'बहुजन प्रेरणा' पुस्तकालयाचे वामन मेश्राम यांच्या हस्ते उदघाटन

बारामतीत 'बहुजन प्रेरणा' पुस्तकालयाचे वामन मेश्राम यांच्या हस्ते उदघाटन 

बारामती:- बारामती नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे यांनी सुरु केलेल्या 'बहुजन प्रेरणा' पुस्तकालयाचे आणि पत्रकार शुभम अहिवळे यांच्या कार्यालयाचे उदघाटन शुक्रवार दि.१३ जानेवारी रोजी बामसेफ,भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या हस्ते झाले.यावेळी मेश्राम यांनी संपूर्ण पुस्तकालयाची पाहणी करून अहिवळे यांच्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना मेश्राम म्हणाले कि मूलनिवासी पब्लिकेशन ट्रस्टच्या  माध्यमातून फुले,शाहू आंबेडकरांच्या विचारांचे साहित्य घराघरात पोहचविण्याचे काम करत असल्यामुळे फुले,शाहू,आंबेडकरांची चळवळ महाराष्ट्रात संपुष्ठात आणण्याचे काही लोकांचे मनुसूबे उध्वस्त झाले आहेत. बहुजन महापुरुषांचा खरा इतिहास समजून घेण्यासाठी आपण हि पुस्तके वाचली पाहिजेत.चळवळीतील प्रत्येकासाठी हि पुस्तके प्रेरणादायी असून आपण ती नुसती खरेदी न करता त्याच वाचन देखील केलं पाहिजे असं परखड मत मांडत त्यांनी विविध विषयांवर उपस्थितांना संबोधित केलं.

दरम्यान,महापुरुषांच्या जयंत्या आणि स्मृतिदिन वगळता इतर दिवशी बहुजन महापुरुषांची हि पुस्तके कुठे हि मिळत नाहीत.त्यामुळे बहुजन चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण हे पुस्तकालय सुरु केलं असून या ठिकाणी बहुजन महापुरुषांच्या कार्यावर आधारित वैचारिक आणि प्रबोधनात्मक पुस्तके मिळतील अशी माहिती ॲड.सुशिल अहिवळे यांनी दिली.या प्रसंगी बामसेफ चे जिल्हाध्यक्ष आनंद थोरात,भारत मुक्ती मोर्चाचे प्रचारक सचिन बनसोडे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक आणि विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ लोंढे यांनी केले.

No comments:

Post a Comment