बारामती तालुक्यात अवैध दारू विक्री होत असल्याचे झालेल्या कारवाईमुळे आलं उघडकीस.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 31, 2023

बारामती तालुक्यात अवैध दारू विक्री होत असल्याचे झालेल्या कारवाईमुळे आलं उघडकीस..

बारामती तालुक्यात अवैध दारू विक्री होत असल्याचे झालेल्या कारवाईमुळे आलं उघडकीस..                                           बारामती:-बारामती तालुक्यात अवैद्य दारू विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे उघडकीस येत आहे मात्र कारवाई मूळ मालकावर होत नसून छोटे छोटे व्यावसायिकांवर कारवाई केल्याचं दिसत आहे नुकताच होलसेल अवैध दारू विक्री करणाऱ्याने किरकोळ दारू विक्री करणाऱ्या महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली,तर असे अनेक घटना घडत असताना गुन्हेगारी घडत आहे, नुकताच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनने हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या संगीता खन्ना गागडे रा. वाघळवाडी ता. बारामती व रणजित विरसिंग रावळकर रा. वाघळवाडी ता. बारामती यांच्या वर कारवाई करून गुन्हा दाखल केला तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री करणाऱ्या संतोष विलास घाडगे  रा. सांगवी ता. बारामती, कुमार सोमनाथ गव्हाणे रा. पाहुणेवाडी ता. बारामती, संतोष दत्तू सरवदे रा. सांगवी ता. बारामती, रोहित पांडुरंग नलवडे रा वानेवाडी ता. बारामती यांच्या वर कारवाई केली असल्याचे सांगण्यात आले, ह्या कारवाईमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये समाधान व्यक्त केले असले तरी खरी गंमत म्हणजे निरा गावातून येणारी अवैद्य दारू बारामती तालुक्यातील कित्येक गावात राजरोसपणे विकली जाते हे माहीत असूनही कारवाई मात्र किरकोळ विक्री करणार्यांवर मग होलसेल विक्री करणारा मूळ मालकावर का नाही हे अजबच कोडं पडलं असून याबाबत पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभाग झोपीचं सोंग घेत आहे की काय की आर्थिक देवाण घेवाण चालू आहे म्हणून कारवाई होत नाही अशी सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे याबाबत लवकरच पुराव्यासह गृहमंत्री व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात येणार असल्याचे कळतंय.

No comments:

Post a Comment