यशवंत ब्रिगेडच्या "राज्य प्रवक्ते" पदी सचिन रुपनवर
दौड:- यशवंत ब्रिगेड संघटनेच्या प्रदेश प्रवक्ते पदी दापोडी ता.दौंड येथील सचिन रुपनवर यांची नियुक्ति करण्यात आली आहे.यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष बापुराव सोलनकर यांनी निवडीचे पत्र दिले.यावेळी यशवंत ब्रिगेडचे कार्याध्यक्ष संपतराव टकले,श्री.गोसावी,लक्ष्मण घोळवे आदी उपस्थित होते. निवड झाल्यानंतर सचिन रुपनवर यावेळी म्हणाले की,यशवंत ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून बहुजन समाजामध्ये सामाजिक क्रांती घडवण्यासाठी व समाजातील तरुणांना दिशा देण्याचे काम यापुढे यशवंत ब्रिगेड करेल असे रुपनवर यांनी सांगितले.माझ्यावर संघटनेने मोठी जबाबदारी दिली आहे,संघटनेचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
No comments:
Post a Comment