मोटरसायकल चोरांची टोळी शहर पोलिसांच्या ताब्यात... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, January 28, 2023

मोटरसायकल चोरांची टोळी शहर पोलिसांच्या ताब्यात...

मोटरसायकल चोरांची टोळी शहर पोलिसांच्या ताब्यात...
बारामती:- बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दी मधून मोटरसायकली चोरी होत असून त्याबाबत गुन्हे उघड करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अंकित गोयल व अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी शहर पोलिसांना दिलेले आहेत. बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 1)गुड्डू उर्फ वैभव बाळू बगाडे वय 20 वर्षे राहणार जवाहरनगर भोई गल्ली, अक्षय हरिदास सोनवणे वय 25 वर्षे राहणार जवाहर नगर व रोहित राजेंद्र खरात वय 19 वर्ष हे मोज मजासाठी एक्टिवा गाड्या चोरीत आहेत सदरची माहिती मिळाल्या नंतर पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांचे मार्गदर्शना खाली सपोनि संकपाळ ,पो हवा रामचंद शिंदे ,पो हवा दशरथ कोळेकर ,कल्याण खांडेकर ,अभिजीत कांबळे ,पो कॉ तुषार चव्हाण ,पो कॉ दशरथ इंगोले ,पो कॉ  अक्षय सीताप, पो कॉ सागर जामदार ,पो कॉ शाहू राणे यांनी वरील तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली व त्यांच्याकडून दोन एक्टिवा शहरातून चोरी गेलेल्या व एक कुळवाडी येथून चोरी गेलेली हिरो होंडा अशा तीन मोटरसायकली जवळजवळ एक लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर आरोपींकडे अजून चौकशी करून आणखी काही गुन्हे केले आहेत का याबाबत माहिती घेत आहोत अशी माहिती देण्यात आली.

No comments:

Post a Comment