धक्कादायक..भरदिवसा निर्घृणपणे विधवा महिलेची हत्या..!
रायगड :-हत्या करताना क्रूरतेच्या सर्व परिसीमा पार केल्या याबाबत मिळालेली माहीती अशी की,रायगड येथील तळा तालुक्यातील
मांदाड कोळीवाड्यात मच्छी विक्री करणाऱ्या एका विधवा महिलेची भरदिवसा निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मांदाड कोळीवाडा परिसरातील संशयित आरोपी पांडुरंग लक्ष्मण मानकर
(वय 50) याला तळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.शनिवारी 25 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास ही हत्या करण्यात आली आहे.आरोपीने हि हत्या करताना क्रूरतेच्या सर्व परिसीमा पार
केल्या आहेत. आरोपीने मयत महिलेचे डोळे फोडले त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर आघात करून चेहरा विद्रुप केला. या थरारक घटनेने संपूर्ण तळा परिसर हादरला आहे. विठा लक्ष्मण पाटील (वय 55) असे या मृत महिलेचे नाव आहे. त्या मांदाड कोळीवाड्यात मच्छी विक्रीचे काम करायच्या. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला
होता.विठा लक्ष्मण पाटील या घरी एकट्याच राहत होत्या.त्या मासे विकून आपला उदारनिर्वाह करत होत्या.ही महिला बाजारात मासे विकत असताना या महिलेची संशयित लक्ष्मण मानकर यांच्याशी वादावादी झाली आणि याच रागातून आरोपीने या महिलेकडे मासे साफ करण्यासाठी असलेल्या कोयत्याने तिची अत्यंत क्रूरपणे
हत्या करण्यात आली. या हत्येची माहिती मिळताच तळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
No comments:
Post a Comment