बारामती नगर परिषदे समोर ड्रेनिजच्या झाकणाला धडकून गेला एकाचा बळी? सुरक्षितेचा फलक नसल्याने झाला अपघात.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, February 27, 2023

बारामती नगर परिषदे समोर ड्रेनिजच्या झाकणाला धडकून गेला एकाचा बळी? सुरक्षितेचा फलक नसल्याने झाला अपघात.!

बारामती नगर परिषदे समोर ड्रेनिजच्या झाकणाला धडकून गेला एकाचा बळी?सुरक्षितेचा फलक नसल्याने झाला अपघात.!                                                            बारामती(संतोष जाधव):- बारामतीत झपाट्याने विकास होत आहे व ते दिसतही आहे पण नेमका कुठला हेही माहीत आहे, अश्याच विकासाच्या नावाखाली तीन हत्ती चौकात कॅनॉल पुलाचे कामा बरोबर रस्त्याचे काम अनेक महिने चालू आहे अश्यातच नुकताच घाईगडबडीत काही टप्प्यात डांबरीकरण झाले, पण हे करत असताना रस्त्याच्या मधोमध असणारे ड्रेनिज मात्र उंचीवर राहिले त्याचे झाकण हे फोटो मध्ये पाहिल्यास लक्षात येईल याच उंच झाकणामुळे नुकताच दोन दिवसांपूर्वी एका वयोवृद्ध अजित छाजेड राहणार मार्केट यार्ड रोड,बारामती (वय 58) च्या आसपास असणारे गृहस्थ या झाकणाचा अंदाज न आल्याने धडकल्याने त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याचे त्यांचे नातेवाईक व प्रत्यक्षदर्शी पाहणारे सांगत आहे,अश्या चुकीच्या कामामुळे व  हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदाराला व त्या कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकारी यांना का दोषी धरू नये अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे याबाबत लवकरच कायदेशीर दावा दाखल करणार असल्याचे सामाजिक संघटनानी सांगितले, अश्याच प्रकारे रस्त्याच्या मधोमध असणारा डिवायडर अस्तव्यस्त झाला असून त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचा सुरक्षितेचा फलक अथवा लाल रंगाचा इशारा सूचक बोर्ड लावला नाही अशीच परिस्थिती तिनहत्ती चौक रस्त्यात त्रिकोणी सळ्याची धोकादायक जाळी उभा केली असून वाहनचालकांना याचा अंदाज येत नाही कारण येथील कोणत्याही प्रकारचे सुरक्षितेसाठी उपाय योजना राबविण्यात आली नाही की फलक लावण्यात आले नाही हे फोटोवरून दिसेल पण अश्या हलगर्जीपणामुळे  कदाचित दुर्दैवी घटनेला सामोरे जावे लागत आहे याकडे संबंधित खात्याचे अधिकारी कधी लक्ष देतील व भल्या पहाटे या कामाची पाहणी करत असताना आदरणीय अजितदादा यांनी अश्या हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व ठेकेदार यांना कडक समज द्यावी अशी सर्वसामान्य जनतेकडून भावना व्यक्त करण्यात येत आहे, जर वेळीच सुरक्षतेची उपाय योजना राबविली असती तर एका वयोवृद्ध गृहस्थाला आपला जीव गमवावा लागला नसता व त्यांचे कुटुंब उघड्यावर आले नसते यासाठी तातडीने कार्यवाही व्हावी व संबंधित ठेकेदार व देखरेख अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी लवकरच आंदोलन करणार असल्याचे कळतंय.

No comments:

Post a Comment