श्री. अरविंद संपतराव जगताप यांची बारामती उपविभाग कृषी उत्पन्न बाजार समिती सेवक सहकारी पतसंस्था मर्या.या संस्थेचे चेअरमन पदी बिनविरोध निवड.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, February 18, 2023

श्री. अरविंद संपतराव जगताप यांची बारामती उपविभाग कृषी उत्पन्न बाजार समिती सेवक सहकारी पतसंस्था मर्या.या संस्थेचे चेअरमन पदी बिनविरोध निवड..

श्री. अरविंद संपतराव जगताप यांची बारामती उपविभाग कृषी उत्पन्न बाजार समिती सेवक सहकारी पतसंस्था मर्या.या संस्थेचे चेअरमन पदी बिनविरोध निवड..


बारामती:- बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री. अरविंद संपतराव जगताप यांची  बारामती, दौंड, इंदापुर, पुरंदर उपविभाग कृषी उत्पन्न बाजार समिती सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, दौंड या संस्थेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली. तसेच बारामती समितीचे सेवक सुर्यकांत मोरे, शरद भोसले, बाबासो देवकाते, सुरेखा कुर्ले  यांची संचालक म्हणुन निवड झाली आहे. याबद्दल बारामती, दौंड, इंदापुर, पुरंदर चे सर्व सेवकांकडुन अभिनंदन करणेत आले. तसेच पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देणेत आल्या.
सदर संस्थेचे स्थापना सन २००० साली झाली असुन बारामती, दौंड, इंदापुर, पुरंदर या बाजार समित्यांचे सेवक सभासद आहेत. सदर संस्था स्थापनेची कल्पना ही त्यांचीच होती. याचा सर्व सेवकांना फायदा व्हावा व भविष्याची बचत व्हावी असा उद्देश होता. हाच उद्देश सफल होऊन आज संस्थेचे वाटचाल चागल्या प्रकारे सुरू आहे. सध्या संस्थे मार्फत ७.५% दराने सेवक सभासदांना कर्ज वाटप होत आहे. तसेच दरवर्षी लाभांश वाटप केला जातो. 
पतसंस्थे मार्फत सभासदांना योग्य दराने व वेळेत कर्ज वितरण करणे, अडचणी समजावुन घेणे व आणखी सुविधा पुरविणेची ग्वाही यावेळी चेअरमन श्री. अरविंद जगताप यांनी दिली.

No comments:

Post a Comment