बाळासाहेबांची शिवसेना वाहतूक सेना जिल्हाप्रमुख पदी दिगंबर पडकर - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, February 17, 2023

बाळासाहेबांची शिवसेना वाहतूक सेना जिल्हाप्रमुख पदी दिगंबर पडकर

बाळासाहेबांची शिवसेना वाहतूक सेना जिल्हाप्रमुख पदी दिगंबर पडकर 

बारामती:- वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रीय कर्मचारी संघटना या युनियनच्या वाहतूक विभाग पुणे जिल्हा अध्यक्षपदी बारामती येथील दिगंबर पडकर यांची निवड करण्यात आली. बाळासाहेबांची शिवसेना राष्ट्रीय कर्मचारी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष मा. आमदार मा.श्री.किरण पावसकर यांच्या हस्ते दिगंबर पडकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.या वेळी माजी मंत्री,शिवसेना उपनेते मा.श्री.विजय बापू शिवतारे यांनी शुभेच्छा दिल्या.

दिगंबर पडकर हे सन १९८२ पासून बारामती येथे सुभाष चौक शिवसेना शाखाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सन २००४ पासून महाराष्ट्र वाहतूक सेना बारामती तालुका प्रमुख म्हणून काम केले आहे. सन २००९ पासून वाहतूक सेना पुणे जिल्हा प्रमुख म्हणून बारामती, इंदापूर, दौंड कार्यक्षेत्रात काम पाहिले आहे.

 मध्यंतरी स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादामुळे फक्त शिवसैनिक म्हणून कार्यरत,तदनंतर बाळासाहेबांची शिवसेना मध्ये सक्रिय काम करत असतानाच पडकर यांना वाहतूक सेनेच्या जिल्हाप्रमुख पदी पक्षाने काम करण्याची संधी दिली आहे.

डॉ.महेश पोरे राष्ट्रीय कर्मचारी संघटना उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य,देवेंद्र बनकर पुणे जिल्हा उपप्रमुख,विनोद किर्वे,समर्थ खाडे,महेश काळे,विजय दळवी,ओंकार दराडे देविदास पडकर,अमित खाडे यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment