खाजगी सावकारांकडून मासिक १० ते २० टक्के व्याजदराने वसुली चालू,सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या..! दौंड :- सावकारी किती वाढलीय त्याचे अनेक उदाहरणे आहेत, कुणी दाखल करतात तर कुणी भीतीपोटी शांत बसतात तर कुणाचा बळी जातो अश्या बातम्या नेहमीच वाचतो नुकताच दौंड शहरात खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणारा तरुण व्यापारी विशाल दुमावत याच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी फक्त दोन जणांना अटक केली आहे. तीन आठवड्यानंतरही या प्रकरणातील दोन महिलांसह एकूण सात संशयित फरारी आहेत.दौंड शहरातील भांड्याचे व्यापारी विशाल शांतिलाल दुमावत (वय ३७, रा. पंचायत समिती समोर, दौंड) यांनी कीटकनाशक घेतल्याने ४ फेब्रुवारी रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांनी चार वर्षांत दुकानासाठी खासगी सावकारांकडून मासिक
१० ते २० टक्के व्याजदराने तब्बल २५ लाख रुपये घेतले होते. मुद्दल व व्याजाची रक्कम दिल्यानंतरही संबंधित महिला सावकारांसह अन्य सावकार आणखी पैशांची मागणी करीत रात्री दुकान बंद करण्यापूर्वी विशाल यांच्या गल्ल्यातून पैसे काढून घेत होते. नकार दिल्यास त्यांना दुकानातच मारहाण करत. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली.याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात विशाल यांच्या पत्नीने दिलेल्या
फिर्यादीनुसार, नीलिमा गायकवाड, बाबू शेख, नाडी भैय्या, राजू सूर्यवंशी, मुन्नी काझी, टिल्लू काझी, निखिल पळसे, रूपेश जाधव व एक अनोळखी व्यक्ती (सर्व रा. दौंड) यांच्याविरुद्ध
गुन्हा दाखल केला. त्यापैकी निखिल पळसे व रवी सॅमसन गायकवाड या दोघांना अटक झाली आहे. तर,उर्वरित संशयित फरारी आहेत.
विशाल यांनी मोबाईल आत्महत्या करण्यापूर्वी
संचात खासगी सावकारांचा नामोल्लेख
करून झालेला त्यांच्याकडून शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास व्हिडिओच्या माध्यमातून कथन
केलेला आहे. परंतु, या प्रकरणाचा अत्यंत संथ गतीने तपास केला जात असल्याचा नागरिकांमध्ये चर्चा चालू असल्याचे कळतंय.
No comments:
Post a Comment