*रुग्ण हक्क परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी आनंद आरकल*
सोलापूर :- डॉक्टरांचे संरक्षण आणि रुग्णांचे न्याय हक्कासाठी लढणारी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयएसओ मानांकित आशिया खंडातील पहिली संघटना रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश होय. या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी सोलापूर येथील आनंद आरकल यांची आज निवड करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्र रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिले.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील हजारो रुग्णांचे लाखो रुपयांचे बिल माफ करण्यासोबतच, फौजदारी संहितेचा रुग्ण हक्क संरक्षण कायदा व औषध सुरक्षा कायदा झाला पाहिजे यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांचे नेतृत्वाखाली रुग्ण हक्क परिषद सक्रिय आंदोलन उभे करत आहे.
*अधिक माहितीसाठी -*
रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश, मुख्य कार्यालय - 136, दुसरा मजला, माती गणपती जवळ, सिताफळ बाग कॉलनी, नारायण पेठ, पुणे - 411030
फोन - 8806066061
No comments:
Post a Comment