'शालेय विद्यार्थ्यांना मिळाली 'किशोर भेट'ऑल इंडिया लिनेस क्लबचा अनोखा उपक्रम: किशोर मासिकाचे वाटप..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, February 25, 2023

'शालेय विद्यार्थ्यांना मिळाली 'किशोर भेट'ऑल इंडिया लिनेस क्लबचा अनोखा उपक्रम: किशोर मासिकाचे वाटप..!

'शालेय विद्यार्थ्यांना मिळाली 'किशोर भेट'
ऑल इंडिया लिनेस क्लबचा अनोखा उपक्रम: किशोर मासिकाचे वाटप..!
 
बारामती:-ऑल इंडिया लिनेस क्लब च्या माध्यमातून दर महिन्याच्या सामाजिक उपक्रमा अंतर्गत विविध सामाजिक कार्यक्रम राबवले जातात. त्याचप्रमाणे  *लिनेस सीमा चव्हाण, लिनेस मनीषा खेडेकर, लिनेस सुवर्णा मोरे, लिनेस विणा यादव* यांनी पुढाकार घेत बारामती मधील नगरपरिषद शाळांमध्ये आठ शाळांना 'किशोर' या बालभारतीच्या मासिकाचे अंक वाटप केले. अशा प्रकारे दर महिन्याला ४० मासिकाचे वाटप करण्यात येणार आहेत. 
 *हा उपक्रम वर्षभर या सर्व शाळांमध्ये चालू राहणार आहे. अशी ही कायमस्वरूपाची वर्षभर चालणारा उपक्रम  आहे.* 
सदर कार्यक्रम हा नगरपरिषद शाळा क्रमांक दोन, कसबा या ठिकाणी घेण्यात आला. 
सध्या विद्यार्थ्यांची परिस्थिती बघता गोष्टीच्या पुस्तकांपासून लांब जाऊन मोबाईलचे साम्राज्य आलेले दिसते. त्यामुळे मुलांची वाचन क्षमता कमी झालेली आहे. मुलांना वाचनाची गोडी लागावी तसेच अवांतर वाचनाचे महत्त्व  कळावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. तसेच दर महिन्याला या चार लिनेस सदर शाळांना भेट देऊन पुस्तके देणार आहेत तसेच पुस्तक वाचनाचा आढावा घेणार आहेत. 
  या प्रसंगी 'किशोर' पुस्तकाची माहिती लिनेस सुवर्णा मोरे यांनी  विद्यार्थ्यांना दिली.  
या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. 
या कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन लिनेस मनीषा खेडेकर यांनी केले. उपक्रमाचा उद्देश लिनेस सीमाताई चव्हाण यांनी सांगितला.
आभार प्रदर्शन विणा यादव यांनी केले.
लिनेस क्लब बारामतीच्या अध्यक्ष लि. मृदुला मोता, सेक्रेटरी लि. शुभांगी चौधर आणि खजिनदार लि. संगीता मेहता यांनी आजची ॲक्टिव्हिटी केलेल्या चौघींचा खण नारळाने ओटी भरून कौतुकाने सन्मान केला.

No comments:

Post a Comment